मुंबई प्रवास होतोय आरोग्य प्रमाणपत्राविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 12:09 IST2020-07-15T12:09:17+5:302020-07-15T12:09:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचे हॉटस्पॉट मुंबई आणि परिसरातून जिल्ह्याच्या विविध भागात येणाऱ्यांची आणि येथून जाणाºया प्रवाशांची संख्या ...

Traveling to Mumbai without a health certificate | मुंबई प्रवास होतोय आरोग्य प्रमाणपत्राविना

मुंबई प्रवास होतोय आरोग्य प्रमाणपत्राविना

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाचे हॉटस्पॉट मुंबई आणि परिसरातून जिल्ह्याच्या विविध भागात येणाऱ्यांची आणि येथून जाणाºया प्रवाशांची संख्या मोठी आहे़ यातील मोजकेच जण आरोग्य तपासणी करुन प्रमाणपत्र लावत असून उर्वरित मात्र प्रमाणपत्राविनाच जाऊन परत येत असल्याचे समोर आले आहे़
गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातून २८ हजार ९५० जणांना बाहेरगावी प्रवास करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रितसर परवाने दिले होते़ यात राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्यांना आरोग्य प्रमाणपत्रांची अट शिथिल करण्यात आली आहे़ तर परराज्यात जाणाºयांना मात्र आरोग्य प्रमाणपत्र द्यावे लागत आहे़ हा प्रवास करुन हे लोक पुन्हा जिल्ह्यात येत आहेत़ यानंतर मात्र त्यांच्या तपासणीचे काय असा प्रश्न समोर आला आहे़ प्रत्यक्षात मुंबई किंवा इतर रेड झोनमध्ये जाऊन आलेल्या केवळ ५ हजार जणांनीच आतापर्यंत तपासणी करुन घेतल्याची माहिती समोर आली असून उर्वरित २३ हजार परवानाधारक परत आले किंंवा त्यांच्या तपासण्या झाल्या अथवा नाही याची माहिती मात्र प्रशासनाकडे नाही़ यासाठी कोरोना नियंत्रण कक्षात कोणत्याही प्रकारची यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे़ रेड झोन असलेल्या मुंबई किंवा इतर ठिकाणाहून प्रवास करुन आलेल्यांसाठी प्रशासनाने केवळ फिव्हर स्कॅनिंग करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती देण्यात आली़ दरम्यान एकीकडे परवाने आणि तपासणी यांना खो देत बरीच वाहने नियमित मुंबई-पुणेसह विविध शहरांच्या वाºया करुन शहरात दाखल होत असल्याचेही दिसून आले आहे़

जिल्हा रुग्णालयातील कक्षात बाहेरगावाहून आलेल्या ५ हजार ४१३ जणांच्या तपासण्या केल्या गेल्या आहेत़ यात मुंबई व परिसरातून आलेल्यांचाही समावेश आहे़
आयएमएकडून सर्व सदस्य डॉक्टर्सला बाहेरगावी जाणाºयांची तपासणी केल्याशिवाय प्रमाणपत्र देऊ नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत़ तपासणी होण्याच्या भितीने अनेकजण परस्पर निघून जात असल्याचे समोर आले आहे़
जिल्ह्यातून सुरत या गुजरात राज्यातून रेड झोनमध्ये जाणारे आणि येणाºयांची संख्या अधिक आहे़ याठिकाणाहून आलेल्यांची कोणतीही तपासणी करण्यात येत नाही़ शहराबाहेरच्या एकाही चौकात बॅरीकेटींग करुन वाहनांची तपासणी होत नसल्याचे दिसून आले आ

Web Title: Traveling to Mumbai without a health certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.