शॉटसर्कीटमुळे प्रवासी घाबरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 12:51 IST2020-02-02T12:51:17+5:302020-02-02T12:51:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : चालत्या बसच्या चालक कॅबीनमधून शॉर्टसर्कीटमुळे धूर व ठिणग्या उडू लागल्याने प्रवाशांची घाबरगुंडी उडाली होती. ...

Travelers were terrified by the shotsheet | शॉटसर्कीटमुळे प्रवासी घाबरले

शॉटसर्कीटमुळे प्रवासी घाबरले

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : चालत्या बसच्या चालक कॅबीनमधून शॉर्टसर्कीटमुळे धूर व ठिणग्या उडू लागल्याने प्रवाशांची घाबरगुंडी उडाली होती. अनेक प्रवाशांनी घाबरुन खिडकीतूनच बाहेर उड्या मारल्याची घटना शनिवारी घडली.
शहादा बसस्थानकातून शनिवारी सायंकाळी शहादा-खरगोन ही बस प्रवाशांना घेऊन बाहेर पडली. परंतु बसस्थानकातूनन बाहेर आल्यावर लगेचच स्टार्टरमध्ये बिघाड झाल्याने चालक कॅबिनमधून धूर बाहेर पडू लागला. धूर बघताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. चालकाने तेथेच बस थांबवून प्रवाशांना बाहेर काढले. काही प्रवाशांनी घाबरुन खिडकीतूनच उड्या टाकल्या. बसमध्ये महिला, मुली व शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. भररस्त्यात हा प्रकार घडल्याने परिसरातही घबराट पसरली. बस रिकामी झाल्यावर पाणी टाकून स्टार्टरमधील पेटलेल्या वायरी विझवण्यात आल्या. नंतर दुसऱ्या बसने प्रवाशांना रवाना करण्यात आले.

Web Title: Travelers were terrified by the shotsheet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.