तिकीट मशीनच्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:29 IST2019-07-24T11:28:57+5:302019-07-24T11:29:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बस मध्ये तिकीट काढायच्या ईटीआयएम यंत्रात ‘व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीम’  बसविण्यात येत असल्यामुळे आणि कनेक्टीव्हिटीच्या ...

Travelers suffer due to technical breakdown of ticket machines | तिकीट मशीनच्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना झळ

तिकीट मशीनच्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना झळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बस मध्ये तिकीट काढायच्या ईटीआयएम यंत्रात ‘व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीम’  बसविण्यात येत असल्यामुळे आणि कनेक्टीव्हिटीच्या अडचणीमुळे मंगळवारी सकाळपासून यंत्रात व्यत्यय आला. यामुळे वाहकांना मोठय़ा गैरसोयींना सामोरे जावे लागले. यामुळे दिवसभर वेळापत्रक कोलमडल्याने प्रवासी वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये प्रवाशांना तिकीट देण्यासाठी वाहकांना ईटीआय एम यंत्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.  सध्या या यंत्रात जीपीएस सिस्टीम प्रमाणे व्हेईकल ट्रेकिंग सिस्टिम अपलोड केली जात आहे. त्यामुळे मशीनमध्ये काहीसा विस्कळीतपणा देखील आला आहे. याशिवाय वादळ, पाऊस यामुळे इंटरनेट कनेक्टीव्हिटी देखील मिळत नाही. यामुळे मशीन काम करेनासे झाले आहेत. नंदुरबार बस स्थानकात जवळपास 270 ईटीआयएम यंत्रांची सोय उपलब्ध आहे. परंतु मंगळवारी सकाळपासूनच जवळपास 100 पेक्षा अधीक यंत्रांमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली. यामुळे मशीन काम करेनासे झाल्याने वाहकांना गैरसोयींचा सामना करावा लागला. पहाटे पाच वाजेपासून बसचे चालक व वाहक नेहमीप्रमाणे कर्तव्यावर रुजू झाले. परंतु तिकीट काढण्याच्या यंत्रात बिघाड झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर त्यांना स्थानकातून बसेस बाहेर काढण्यासाठी अडचणी निर्माण होऊ लागल्या.
यासंदर्भातील समस्या गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे. याची माहिती वरिष्ठांना देऊनही त्याचा उपयोग होत नव्हता. काहीवेळा वाहक व प्रवाशांमध्ये वादाच्या घटना घडल्या. वरिष्ठांनी यासंदर्भात दखल घेतली नसल्यामुळे मंगळवारी मोठय़ा प्रमाणावर समस्येला सामोरे जावे लागले. 
यंत्र बिघाडाच्या घटनेने स्थानकामधून बस उशिरा धावत असल्याचा प्रकार समोर आला. पहाटेपासूनच बसचे वाहक व चालक नेहमीप्रमाणे कर्तव्याला आले. परंतु, मध्यरात्री तिकीटाच्या यंत्रात बिघाड झाल्यामुळे त्यांनाही मनस्ताप सहन करावा लागला. बस स्थानकाच्या फलाटावर उपस्थित अनेक प्रवाशांनी थेट आगारात जाऊन कर्मचा:यांशी विचारपूस केली. प्रवाशांना त्यांच्या नियोजनानुसार इच्छित स्थळे न जाता आल्यामुळे अनेकांचे नियोजन कोलमडल्याचे चित्र दिसून आले.     

वाहनांना जीपीएस सिस्टीम लावण्याची सध्या पद्धत आहे. यामुळे संबधीत वाहनाचे लोकेशन मिळते. तशीच सिस्टिम एस.टी.बसमध्ये देखील राहणार आहे. परंतु ती बसऐवजी वाहकाच्या तिकीट यंत्रात राहणार आहे. यामुळे कुठली बस कुठल्या शहरात पोहचली. येण्यास किंवा पोहचण्यास किती वेळ आहे. कुठे एखाद्या घटनेमुळे बस थांबून तर नाही याची माहिती कोड नंबरद्वारे आगारात बसून मिळणार आहे. यामुळे वेळापत्रकात सुसूत्रता येणार आहे. 
 

Web Title: Travelers suffer due to technical breakdown of ticket machines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.