शाळेत जाण्यासाठी ट्रॅक्टरने प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 13:10 IST2019-06-23T13:10:19+5:302019-06-23T13:10:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिनोदा : शाळा उघडल्यापासून तळोदा तालुक्यातील मोहिदा, उमरी व गुंजाळी गावातील विद्याथ्र्याचे बसअभावी हाल होत असून ...

शाळेत जाण्यासाठी ट्रॅक्टरने प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
चिनोदा : शाळा उघडल्यापासून तळोदा तालुक्यातील मोहिदा, उमरी व गुंजाळी गावातील विद्याथ्र्याचे बसअभावी हाल होत असून सकाळी साडेसहा व साडेदहा वाजेची बस थांबत नसल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींना ट्रॅक्टरवरून धोकेदायक प्रवास करावा लागत आहे.
मोहिदा गावातील विद्याथ्र्याना दोन ते अडीच किलोमीटर पायपीट करून उमरी येथे यावे लागते. परंतु उमरी येथे आल्यानंतरही बसेस थांबत नसल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनींना ट्रॅक्टरमधून धोकेदायक प्रवास करावा लागत आहे. काही विद्यार्थी प्रवासी वाहतूक करणा:या रिक्षाने शाळेर्पयत पोहोचतात. हा धोकेदायक प्रवास करीत असताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दुर्घटना घडली तर त्याला कोण जबाबदार राहील, असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. उमरी येथे बसेस न थांबल्यास तळोदा बसस्थानकावर मोर्चा काढण्याचा इशारा पालक व विद्याथ्र्यानी दिला आहे. एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिका:यांनी याबाबत दखल घेऊन उमरी येथून जाणा:या व येणा:या सर्व बसेस थांबविण्याची सूचना वाहक व चालकांना द्यावी, अशी अपेक्षा पालक व विद्याथ्र्याकडून व्यक्त होत आहे.