अक्कलकुवा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करा- शिवसेनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST2021-06-17T04:21:43+5:302021-06-17T04:21:43+5:30
शिवसेना जिल्हा प्रमुख आमश्या................ पाडवी यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडे मागणी अक्कलकुवा : अक्कलकुवा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करा ...

अक्कलकुवा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करा- शिवसेनेची मागणी
शिवसेना जिल्हा प्रमुख आमश्या................ पाडवी यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडे मागणी
अक्कलकुवा : अक्कलकुवा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख आमशा................ पाडवी यांनी खासदार संजय राऊत यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात, २०१४ साली तत्कालीन आघाडी सरकारने तालुका मुख्यालयाच्या गावात अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचातीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये करण्याचा सरसकट निर्णय घेतला होता. यानुसार अक्कलकुवा ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाले होते. परंतु तत्कालीन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात सदर निर्णयाविरुध्द याचिका दाखल केली होती. मात्र न्यायलयाने फक्त नगरपंचायतीत रूपांतर करण्याच्या प्रक्रियेत असलेली त्रुटी दुरुस्तीचे आदेश केले होते. मात्र त्यानंतर गावांतर्गत राजकारणामुळे सदर प्रक्रिया करून घेतली नाही. या ग्रामपंचायतीत ४ कोटी ७५ लाख रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण चाैकशीस्तरावर आहे. यातून गावाचा विकास खुंटला आहे. कोणत्याही सोयीसुविधा नागरिकांना मिळत नाहीत. सध्या अक्कलकुवा जिल्हा परिषद गटात आरक्षणाच्या मुद्द्यावरून जागादेखील रिक्त आहे. यामुळे ही पोटनिवडणूक न घेता, नगरपंचायत घोषित करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व तालुका मुख्यालयांच्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत किंवा नगरपालिकेत झाले आहे. परंतु केवळ अक्कलकुवा ही ग्रामपंचायत राहिली. मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना सूचना देऊन अक्कलकुवा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे.