प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 12:02 IST2019-06-16T12:02:14+5:302019-06-16T12:02:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शाळा सुरू होण्याच्या दोन दिवस आधीच प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्राप्त झाले आहेत. रविवारी ...

प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शाळा सुरू होण्याच्या दोन दिवस आधीच प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्राप्त झाले आहेत. रविवारी शिक्षकांना बदल्यांचे आदेश मिळणार आहेत. दरम्यान, आंतरजिल्हा 33 बदल्या करण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचे हे दुसरे वर्ष आहे. शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या दोन दिवस आधी या बदल्यांचे आदेश प्राप्त झाले आहेत. याआधी दोन दिवसांपूर्वी आंतर जिल्हा बदल्या करण्यात आल्या. त्यात जिल्ह्यातून 33 शिक्षक बदली होऊन गेले तर जिल्हाबाहेरील 94 शिक्षक बदली होऊन येणार आहेत.
दुसरा टप्पा हा जिल्हातंर्गत बदल्यांच्या होता. त्यानुसार शनिवारी सायंकाळी ऑनलाईन बदल्यांचे आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत. यामुळे शनिवारी अनेक शिक्षकांनी यासंदर्भात माहिती घेतली. जिल्हा परिषद शिक्षणाधिका:यांनी सर्व गट शिक्षणाधिका:यांना रविवार, 16 रोजी शिक्षकांचे बदली आदेश घेण्यासाठी पाचारण केले आहे. तेंव्हाच शिक्षक बदल्यांची संख्या कळणार आहे.