जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 22:08 IST2020-11-03T22:08:23+5:302020-11-03T22:08:30+5:30
n लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. एलसीबीवर अनेकांचा डोळा होता. परंतु ...

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
n लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. एलसीबीवर अनेकांचा डोळा होता. परंतु विजयसिंग राजपूत यांची तेथे नियुक्ती करण्यात आली आहे. तर एलसीबीचे नवले यांची गृह विभागाच्या उपअधीक्षपदी बदली करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक व सहायक निरिक्षकांच्या बदल्या राज्य व विभाअंतर्गत नुकत्याच करण्यात आल्या. बदली झालेले अधिकारी रुजू झाल्यानंतर आता जिल्हाअंतर्गत बदल्यांचा मुहूर्त काढण्यात आला. त्या अंतर्गत अनेक पोलीस निरिक्षकांना सोयीचे तर काहींना गैरसोयीचे ठरले आहे. स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखा अर्थात एलसीबीला बसण्यासाठी अनेकांचा डोळा होता, परंतु नवापूरचे निरिक्षक विजयसिंग राजपूत यांची तेथे नियुक्ती करण्यात आली. एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांची गृह विभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्याचे निरिक्षक बाळासाहेब भापकर यांची नवापूर पोलीस ठाण्यात बदली झाली. तळोदा पोलीस ठाण्याचे निरिक्षक राजेंद्र शिंगटे यांची अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या निरिक्षकपदी बदली झाली आहे. अद्याप काही अधिकारी नियुक्तीच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र आहे.