मुख्यालयी न थांबणाऱ्या मुख्याध्यापक, अधीक्षकांवर गडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:02 IST2020-02-06T12:02:27+5:302020-02-06T12:02:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुख्यालयी न राहणाºया आदिवासी आश्रमशाळा मुख्याध्यापक व अधिक्षकांचा प्रोत्साहन भत्ता तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्याची ...

Transfers on non-stop headquarters, superintendents | मुख्यालयी न थांबणाऱ्या मुख्याध्यापक, अधीक्षकांवर गडांतर

मुख्यालयी न थांबणाऱ्या मुख्याध्यापक, अधीक्षकांवर गडांतर

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मुख्यालयी न राहणाºया आदिवासी आश्रमशाळा मुख्याध्यापक व अधिक्षकांचा प्रोत्साहन भत्ता तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्याची कारवाई नंदुरबार प्रकल्प अधिकारी वसुमना पंत यांनी केली आहे. यात दहा मुख्याध्यापक व पाच अधीक्षकांचा समावेश आहे.
नंदुरबार आदिवासी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळांना गेल्या महिन्यात अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या होत्या. प्रकल्प अधिकारी, सहायक प्रकल्प अधिकारी, कार्यालय अधीक्षक, सहायक लेखाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्यासह इतर अधिकाºयांचा त्यात समावेश होता.
या अधिकाºयांनी गणोर ता.शहादा येथील आश्रम शाळेत भेट दिली असता मुख्याध्यापक एम.जी.पाटील हे मुख्यालयी नव्हते. राणीपूर, ता.शहादा आश्रम शाळेत मुख्याध्यापक सी.टी.सोनवणे, चिरखान, ता.शहादा आश्रमशाळेत आर.ओ.बिरारी आणि अधीक्षक सुजित बाविस्कर, चांदसैली, ता.शहादा आश्रम शाळेत मुख्याध्यापक पी.बी.सनेर व मलगाव, ता.शहादा आश्रम शाळेत मुख्याध्यापक टी.बी.गिरासे हे मुख्यालयी राहत नसल्याचे स्पष्ट झाले.
नवापूर शहरातील आश्रमशाळेत मुख्याध्यापक के.आर.गावीत, धनगराट, ता.नवापूर आश्रमशाळेत मुख्याध्यापक आर.ए.चव्हाण व अधीक्षक पी.एम.पांडे, भादवड, ता.नवापूर आश्रम शाळेत मुख्याध्यापक एन.डी.जाधव व अधीक्षक एस.एस.भांडारकर, नावली, ता.नवापूर आश्रम शाळेत मुख्याध्यापक बी.आर.महाले व अधीक्षक अमोल चव्हाण, आमरसपाडा, ता.नवापूर आश्रम शाळेत मुख्याध्यापक डी.डी.अहिरे तर लोय, ता.नंदुरबार आश्रम शाळेत अधीक्षक ललित साळुंखे हे मुख्यालयी राहत नसल्याचे स्पष्ट झाले.
त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला, परंतु तो समाधानकारक नसल्याने प्रकल्प अधिकारी यांनी या कर्मचाºयांचा जानेवारी ते मार्च महिन्याचा प्रोत्साहन भत्ता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईमुळे मुख्यालयी न राहणाºया कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: Transfers on non-stop headquarters, superintendents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.