शिक्षकांना विज्ञान केंद्र हाताळणीचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 11:51 IST2019-09-26T11:51:00+5:302019-09-26T11:51:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विद्याथ्र्याना वैज्ञानिक संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने समग्र शिक्षा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या 33 मराठी/उर्दू ...

शिक्षकांना विज्ञान केंद्र हाताळणीचे प्रशिक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विद्याथ्र्याना वैज्ञानिक संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने समग्र शिक्षा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या 33 मराठी/उर्दू शाळांमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात आले आह़े या केंद्रातील साहित्य वापराविषयी शिक्षकांच्या प्रशिक्षण वर्गातून माहिती देण्यात आली़ मंगळवारी डी़आऱ हायस्कूलमध्ये हा प्रशिक्षण वर्ग पार पडला़
जिल्ह्यातील गट शहर साधन केंद्रांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या निवडक शाळांमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात येत आह़े केंद्राच्या उभारणीसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने अहमदाबाद येथील संस्थेची निवड केली आहे. त्यांच्यामार्फत साहित्य पुरवठा आणि विज्ञान केंद्र उभारणी केली जात आहे. राज्यस्तरावर निवड केलेल्या या नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रात नंदुरबार जिल्ह्यातील शाळांचा समावेश आहे. यु-डायस, शाळांची इमारत, भौतिक सुविधा, पटसंख्या व इतर निकषानुसार ही निवड करण्यात आली आह़े नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारल्यानंतर 2017-18, 2018-19 व 2019-20 या वर्षात उभारणी केलेल्या विज्ञान केंद्रातील शिक्षकांना जिल्हास्तरीय प्रशिक्षण देण्यात आले. यात विज्ञान केंद्रातील साहित्याद्वारे विद्याथ्र्यांना शिकवणे, साहित्याची हाताळणी तसेच साहित्य उपयोगीते बाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेस उपशिक्षणाधिकारी युनूस पठाण, सहायक कार्यक्रम अधिकारी मनिषा पवार, प्रा़ डी. एस. सोनवणे, यांनी भेट देत मार्गदर्शन केल़े यावेळी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे अधिव्याख्याता शिवाजी ठाकूर, विषय सहाय्यक अलका पाटील यांनी सनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहिले. प्रिा़ किरण पाटील यांनी उपस्थित शिक्षकांना केंद्रातील साहित्य हाताळणीचे प्रशिक्षण दिल़े
जिल्ह्यात 2017-18 या वर्षात 9, 2018-19 या वर्षात 12 शाळांमध्ये नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रांची उभारणी करण्यात आली आह़े यंदा पुन्हा 12 शाळांची निवड करुन तेथे केंद्र उभारण्यात आल़े यामुळे जिल्ह्यातील 33 शाळांमध्ये प्रयोगशाळांची निर्मिती झाली आह़े