शहादा-खेतिया मार्गावर जीवघेणी अवैध प्रवासी वाहतूक
By Admin | Updated: January 11, 2017 00:14 IST2017-01-11T00:14:38+5:302017-01-11T00:14:38+5:30
शहादा- खेतिया मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणा:या वाहनधारकांची मनमानी सुरू असून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

शहादा-खेतिया मार्गावर जीवघेणी अवैध प्रवासी वाहतूक
ब्राrाणपुरी : शहादा- खेतिया मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणा:या वाहनधारकांची मनमानी सुरू असून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
मध्य प्रदेशातील खेतिया येथे मोठी बाजारपेठ आहे. येथे शनिवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारात खरगोन, मुबारकपूर, गणोर, आडगाव येथील नागरिक मोठय़ा प्रमाणात बाजार करण्यासाठी जातात. त्यांना तेथे जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था नसल्याने नाईलाजाने अवैध प्रवासी वाहतुकीचा आसरा घ्यावा लागतो. मात्र जीपगाडी व रिक्षामध्ये माणसांना जनावरांसारखे कोंबले जाते. एका वाहनात 20 ते 25 प्रवासी घेऊन भरधाव वेगाने ही वाहने धावतात. काही वाहने नादुरुस्त असून वाहन चालविण्याचा परवाना नसलेले अल्पवयीन मुले वाहन चालवतात. संबंधित विभागाने अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)