तळोद्यात वाहतुकीची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:58 IST2021-02-18T04:58:30+5:302021-02-18T04:58:30+5:30
तळोदा शहरातील बसस्थानक, स्मारक चौक, मेनरोड, कॉलेज रोड या गजबलेल्या भागात व्यावसायिकांची संख्या मोठी आहे आणि वाहतुकीच्या कोंडीने हे ...

तळोद्यात वाहतुकीची समस्या
तळोदा शहरातील बसस्थानक, स्मारक चौक, मेनरोड, कॉलेज रोड या गजबलेल्या भागात व्यावसायिकांची संख्या मोठी आहे आणि वाहतुकीच्या कोंडीने हे रस्तेच अधिक प्रभावित होत असतात. कारण वाहनचालक येथेच बेजबाबदारपणे आपली वाहने लावत असतात. शुक्रवारच्या बाजाराच्या दिवशी तर तळोदाकरांना दिवस भरवाहतूक कोंडीस सामोरे जावे लागते.
बेकायदेशीरपणे कुठेही पार्किंग करून वाहतुकीस अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांकडून अशा वाहन चालकांवर कलम १२२ प्रमाणे कारवाई करण्यात येत असते. त्यांच्यावर २००, ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाते. न्यायालयात पाठवले तर एक हजार रुपयांपर्यंतची कारवाई केली जात असते. तळोदा पोलिसांकडून दर महिन्याला अशा १०० ते १५० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
तळोदा शहराची लोकसंख्या ४२ हजार. चारचाकी वाहने एक हजार ५०. दुचाकी ११ हजार.