दरडी कोसळल्याने सातपुडय़ातील वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:39 IST2019-07-30T12:39:30+5:302019-07-30T12:39:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी रस्त्यावरील देवगोई घाट, भराडीपादर ते कुवा यासह अतिदुर्गम भागातील घाट सेक्शनच्या ...

Traffic jam in Satpudia due to heavy downpour | दरडी कोसळल्याने सातपुडय़ातील वाहतूक ठप्प

दरडी कोसळल्याने सातपुडय़ातील वाहतूक ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी रस्त्यावरील देवगोई घाट, भराडीपादर ते कुवा यासह अतिदुर्गम भागातील घाट सेक्शनच्या रस्त्यांवर संततधार पावसामुळे दरडी कोसळून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने रस्त्यावर पडलेले दगड व मातीचा मलबा तात्काळ उचलून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावरील देवगोई घाटात रविवारी रात्री मुसळधार पावसामुळे दरड कोसळून रस्त्यावर दगड व माती पडली आहे. दगड व मातीच्या मलब्यामुळे या घाट सेक्शन रस्त्यावर वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जात वाहने न्यावी लागत आहे. भराडीपादर ते कुवा या घाट सेक्शनच्या रस्त्यावर आदरबारीच्या वरील भागात पावसामुळे रविवारी दोन-तीन ठिकाणी दरड व मातीच्या मलबा कोसळून पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. गेल्या 
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने सातपुडय़ाच्या घाट सेक्शनच्या रस्त्यांवर दरड व मातीचा मलबा कोसळण्याच्या घटना सुरुच असून खापर, रायसिंगपूर, भराडीपादर, कुवा या रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी तर वाहतूकच ठप्प झाली आहे. दरड कोसळून रस्त्यावर पडलेले मोठमोठे दगड व मातीचा मलबा संबंधित विभागाने तातडीने उचलून रस्ता वाहतुकीसाठी सरळीत करण्याची मागणी डाबचे उपसरपंच धिरसिंग फुसा वळवी, कंकाळामाळ येथील रायसिंग वळवी यांच्यासह त्रस्त वाहनधारकांनी केली आहे.
दरम्यान, पावसाळ्यात दरवर्षी घाट सेक्शनच्या रस्त्यांवर दरडी कोसळून वाहतुकीला अडथळा निर्माण  होतो. रस्त्यावर पडलेले दगड व         माती काही ठिकाणी वर्षभर उचलली जात नाही. परिणामी वाहनधारकांचे हाल होतात. त्यामुळे संबंधित विभागाने दरड कोसळल्यानंतर तातडीने दगड व माती उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज आहे.

अक्कलकुवा-मोलगी रस्त्यावर देवगोई घाटाच्या खाली शनिवारी मध्यरात्री पावसाच्या संततधारेमुळे  तीन ते चार ठिकाणी झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. याठिकाणी वाहनधारकांना वाहने वळवून काढावी लागत आहे. गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावर देवगोई घाटात शनिवारी मध्यरात्री पावसामुळे तीन-चार ठिकाणी झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्यावर उन्मळून पडलेली ही झाडे वाहनधारकांना त्रासदायक ठरत असून संबधित विभागाने ही झाडे सरकवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.
 

Web Title: Traffic jam in Satpudia due to heavy downpour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.