चांदसैली घाटातील दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:37 IST2021-09-09T04:37:22+5:302021-09-09T04:37:22+5:30
सकाळी तळोदा उपविभाग बांधकाम विभागाचे सहायक अभियंता एस. जी. सूर्यवंशी यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्या साहाय्याने दरड हटवण्याचे काम ...

चांदसैली घाटातील दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
सकाळी तळोदा उपविभाग बांधकाम विभागाचे सहायक अभियंता एस. जी. सूर्यवंशी यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्या साहाय्याने दरड हटवण्याचे काम केले. सुमारे १०० मीटर अधिक रस्ता व धोकेदायक वळणावर ही दरड कोसळली असल्याने पायी निघणेही मुश्किल झाले होते.
धडगावचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली. तसेच उपचार न मिळाल्याने मयत झालेल्या चांदसैली येथील महिलेच्या घरी जाऊन घटनेची शहानिशा केली. सायंकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत यांनी देखील घटनास्थळाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सकाळी ९ वाजेपासून घाटातील दरड हटवण्याचे काम सुरु करण्यात आले होते. हे काम सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरु होते. पाऊस आणि दाट धुके यामुळे काम करताना अडचणी येत असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. वेळोवेळी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुन्हा छोटे मोठे दगड गोटे रस्त्यावर येत असल्याचे प्रकार सुरुच होते. सायंकाळी मात्र पाऊस बंद झाल्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्ता वाहतूक सुरळीत करण्यात यश आले.