सातपुडय़ात पारंपरिक वाघदेव आणि निलचरी पूजनास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:51 PM2019-07-20T12:51:21+5:302019-07-20T12:51:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : सातपुडय़ात वाघदेव आणि निलपी-निलचरी पूजनाला प्रारंभ करण्यात आला आह़े पावसाळ्यात उगवलेलेल्या रानभाज्या खाण्याची निसर्गाकडून ...

Traditional Wagdev and Nilchari worship begins in Satpudi | सातपुडय़ात पारंपरिक वाघदेव आणि निलचरी पूजनास प्रारंभ

सातपुडय़ात पारंपरिक वाघदेव आणि निलचरी पूजनास प्रारंभ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : सातपुडय़ात वाघदेव आणि निलपी-निलचरी पूजनाला प्रारंभ करण्यात आला आह़े पावसाळ्यात उगवलेलेल्या रानभाज्या खाण्याची निसर्गाकडून परवानगी मागून हिंस्त्र श्वापदापासून गुराढोरांचे संरक्षण व्हावे यासाठी दरवर्षी आषाढात सातपुडय़ातील गावोगावी वाघदेव  आणि निलचरी पूजन केले जात़े     
पावसाला सुरूवात झाल्यानंतर  जुलै व ऑगस्ट या महिन्यात प्रत्येक गावात वाघदेव पूजनाला सुरूवात होत़े याला काही भागात बाबदेव पूजन म्हटले जात़े या पूजनाच्या तयारी सध्या सातपुडय़ाच्या कुशीतील गावपाडय़ात लगबग सुरू आह़े गावागावात ग्रामस्थांच्या बैठका होत असून वाघदेव पूजनाचा कालावधी ठरवला जात आह़े आदिवासी बांधवांच्या दृष्टीने वाघदेव पूजन महत्वपूर्ण मानले जात असल्याने बैठकांमध्ये उपस्थित राहून ग्रामस्थ जबाबदारीची कामे वाटून घेत आहेत़ येत्या ऑगस्ट महिन्यार्पयत वाघदेव पूजनाचे कार्यक्रम धडगाव तालुक्यात जागोजागी होणार असल्याची माहिती आह़े सर्वात प्रथम तालुक्यातील चोंदवाडे आणि हरणखुरी येथे मोठय़ा उत्साहात वाघदेव पूजनाचा सोहळा पार पडला़  
गावोगावी सामुहिक पद्धतीने होणा:या वाघदेव पूजनात पोलीस पाटील, करवाण्या, डाया, कारभारी, पुजारा यांना यावेळी विशेष मान असतो़  यावेळी पावसामुळे रानात उगवलेल्या भाजीपाल्याचे पूजन होत़े या भाजीपाल्याला निलपी किंवा निलिचारी असेही म्हणतात़ धडगाव तालुक्यात आतार्पयत मुंगबारी, भोगवाडे, बोरवण, उमराणी यासह विविध गावात वाघदेव पूजनाचे कार्यक्रम उत्साहात पार पडल्याची माहिती आह़े दुसरीकडे विविध गाव पाडय़ांवर साहित्याची जुळवाजुळव सुरू असून सातपुडय़ात सुरू झालेल्या या पूजनामुळे आदिवासी बांधवांमध्ये उत्साह संचारला आह़े  
निसर्गाच्या या पूजनात प्रत्येक घरातून एक किंवा दोन माणसे सहभागी होतात़ पूजन केल्यावर घराकडे परतणा:या प्रत्येक माणसाला, सागाच्या पानात धान्य प्रसाद बांधून दिला जातो़ ही पुडी घराच्या छतात ठेवून दिली जात़े यामुळे घरात भाजीपाला किंवा इतर फळे खाता येतात, अशी धारणा आह़े सातपुडय़ात सुरू असलेल्या वाघदेवाच्या उत्सवात शिक्षण आणि नोकरीनिमित्त बाहेर राहणारे स्थानिक रहिवासीही हजेरी लावत आहेत़ 

वाघदेव किंवा बाबदेव पूजन करणे म्हणजे पाऊस पडल्यानंतर नव्याने उगवलेल्या रानभाज्या, शेतशिवार आणि परसातील पालेभाज्या शिजवून खाता याव्यात अशी परवानगी निसर्गाकडून घेणे होय़ या पूजनानंतर आदिवासी बांधव पालेभाज्या तोडणे, फळे तोडून खाणे, धान्य व इतर कडधान्य ठेवण्यासाठी सागाची मोठी पाने तोडतात़ पूजनाआधी मात्र या प्रकारची कोणतीही कृती आदिवासी बांधव करत नाहीत़ त्यामुळे वाघदेव पूजन हे निसर्गाच्या परवानगीचे पूजन मानले जात़े

संपूर्ण गावाचे आरोग्य, पशुधन, शेतवाडी चांगली राहून सुखशांती नांदावी अशी कामाना या पूजनावेळी आदिवासी बांधव करतात़ वाघदेव किंवा बाबदेव पूजनासाठी प्रथमत: गावक:यांची बैठक बोलावण्यात येत़े बैठकीत पूजनासाठी येणारा खर्च आणि कामांबाबत विचारविनिमय करण्यात येऊन आराखडा तयार करण्यात येतो़ पूजनासाठीच्या आवश्यक साहित्याची जुळवाजुळव झाल्यानंतर सवडीचा दिवस पाहून वाघदेवाची पूजा केली जात़े वाघदेव पूजनाच्या दिवशी समस्त गावकरी एकत्र जमून टेकडीवर किंवा विशिष्ट ठिकाणी स्थापन केलेल्या वाघदेवाची पूजा केली जात़े यावेळी प्रत्येक घरातून थोडेथोडे धान्य आणले जात़े त्याचा पूजनासाठी वापर करण्यात येतो़ बाबदेवाची पूजा ही गावाने किंवा ग्रामस्थांनी ठरवून दिलेला पुजारीच करतो़ गावोगावी पुजारी व कारभारी यांच्या बैठका घेत नियोजन केले जात़े 
 

Web Title: Traditional Wagdev and Nilchari worship begins in Satpudi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.