पावी व मांदलच्या तालावर रंगले पारंपारिक गेर नृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 21:47 IST2020-03-12T21:47:25+5:302020-03-12T21:47:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहिर : होळीच्या पार्श्वभूमीवर दर दोन वर्षांनी साजरी होणारा डिंडन उत्सवाला सातपुड्याच्या पायथ्याशी सोजडान ता. अक्कलकुवा ...

पावी व मांदलच्या तालावर रंगले पारंपारिक गेर नृत्य
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहिर : होळीच्या पार्श्वभूमीवर दर दोन वर्षांनी साजरी होणारा डिंडन उत्सवाला सातपुड्याच्या पायथ्याशी सोजडान ता. अक्कलकुवा येथून सुरुवात झाली आहे. यात पारंपरिक पावी (बासरी) व मांदलच्या ताला-सुरात व्रत पाळणाऱ्या तथा मुलींच्या वेशभूषेतील मुलांनी गेर नृत्य सादर केले.
सातपुड्याच्या पायथ्याशी यंदाच्या होलीकोत्सवात थाळी मांदल व पावीच्या सुराच्या तालावर डिंडन गेरनुत्याला सोजडान ता. अक्कलकुवा येथून सुरवात झाली. यासाठी ४१६ नवीन मुलांनी मुलींची वेशभूषा परिधान करीत डिंडन गेरनृत्यात सहभाग नोंदवला. दर दोन वर्षांनी येणाºया या डिंडन उत्सवात दोन राज्यातील नागरिक सहभागी झाले. या उत्सवात नृत्य सादर करणाºया पथकांमधील ४१६ नवीन मुलांनी दि.२७ फेब्रुवारीपासून सराव केला होता. पथकात सर्व मुलेच असले तरी त्यांना मुलींची वेशभूषा करावी लागते. त्यामुळे त्यांना तेथील भाषेत पोयरी म्हणून संबोधले जाते. तर हीच मुले एका दुसऱ्यांदा होणाºया उत्सवात सहभागी झाल्यास त्यांना जुवानी म्हटले जात आहे.
डिंडनमधील मुलांना व्रत पाळावे लागते, त्यांना आंघोळ करता येत नाही, पायात चप्पल टाळावे लागतात. भर उन्हातही ब्लँकेट पांघरावे लागते, घरी जाता येत नाही, जोपर्यंत डिंडनचे नियोजित कार्यक्रम पुर्ण होत नाही तोपर्यंत पालनी (व्रत) च्या बंधनात नियमानुसारच राहावे लागते.
डिंहन नुत्यात डोक्यावर फेटा बांधून आकर्षित लुगडे कमरेला बांधुन गळ्यात चांदीच्या पारंपारीक दागिने, पायात पायल असे चांदीच्या दागदागीने घालून हे कलाकार सजून हातात डिंडन घेत या डिंडन गेरनृत्यात मांदल व पावीच्या सुरात एका तालावर नुत्य सादर करीत आहे. जुवानी यांनी डोक्यावर फेटा व शर्ट धोतर परिधान करून हातात सतात घेत गेरनृत्यात सहभागी होत आहे. हे डिंडन गेरनृत्य पाहण्यासाठी नृत्य पथकातील पोयºया व जुवानी यांच्या कुटुंबियांसह गुजरात व महाराष्टÑातील नागरिकांनी उपस्थिती नोंदवली. ज्या गावात डिंडनचे आयोजन करण्यात आले त्या गावातील ग्रामस्थाकडुन त्याच्या नातेवाईकांना आमत्रंण देत त्यांच्या पाहुणचार करण्यात येत आहे.
सकाळपासून या डिंडन गेर नुत्याच्या तयारी करीत दुपारी १ वाजेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्र्यंत मांदल, थाळी व पावीच्या तालावर नुत्य सादर केले जात आहे. हेच पथके पुन्हा दुसºया गावातील कार्यक्रमासाठी तेथे मुक्कामीच जात आहे. त्यांच्यासाठी त्या-त्या गावातील ग्रामस्थांकडून निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे.
डिंडनमधील मुलांना व्रत पाळावे लागते, त्यांना आंघोळ करता येत नाही, पायात चप्पल टाळावे लागतात. भर उन्हातही ब्लँकेट पांघरावे लागते, घरी जाता येत नाही, जोपर्यंत डिंडनचे नियोजित कार्यक्रम पुर्ण होत नाही तोपर्यंत पालनी (व्रत) च्या बंधनात नियमानुसारच राहावे लागते.
डिंडन नृत्यात डोक्यावर फेटा बांधून आकर्षित लुगडे कमरेला बांधुन गळ्यात चांदीच्या पारंपारीक दागिने, पायात पायल असे चांदीच्या दागदागीने घालून हे कलाकार सजून हातात डिंडन घेत या डिंडन गेर नृत्यात मांदल व पावीच्या सुरात एका तालावर नुत्य सादर करीत आहे.