शासनाच्या सूचनेनुसारच होणार पारंपरिक गणेशोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 12:52 IST2020-07-13T12:52:25+5:302020-07-13T12:52:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आगामी गणेशोत्सव हा साधेपणाने मंडळांनी साजरा करावा यासाठी मार्गदर्शक सूचना ...

शासनाच्या सूचनेनुसारच होणार पारंपरिक गणेशोत्सव
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आगामी गणेशोत्सव हा साधेपणाने मंडळांनी साजरा करावा यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत़ शासनाकडून जाहिर करण्यात आलेल्या सूचनांचे गणेश मंडळांनी स्वागत केले असून साधेपणाने उत्सव साजरा करुन कोरोनाचा संसर्ग होवू देणार नाही असा निर्धार केला आहे़
दीडशतकी परंपरा असलेल्या नंदुरबार शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती ह्या पारंपरिक पद्धतीने तयार करुन आगळावेगळा असा गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे़ मानाचे श्रीमंत दादा गणपती, श्रीमंत बाबा गणपती यांच्यासह गणेश मंडळांचा गोतावळा संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे़ काळ्या मातीतून घडवण्यात येणाऱ्या या सर्व मूर्तींमुळे हा उत्सव पारंपरिक ईको फ्रेंडली गणेशोत्सव आहे़ यामुळे याठिकाणी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी उसळते़ गर्दीमुळे कोरोना होण्याची शक्यता असल्याने १२ प्रकारच्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत़ यात प्रामुख्याने मूर्तींचा आकार हा लहान ठेवण्याचे सुचवले आहे़ शहरातील बहुतांश मंडळांच्या मूर्ती ह्या आकाराने तशा लहानच असल्याचे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले़
शासनाच्या निर्णयानुसार गणेशोत्सव साजरा होईल़ मंडळाची बैठक घेऊन सगळ्यांना याबाबत माहिती दिली जाईल़ श्रीमंत बाबा गणपतीची मूर्ती ही चार फूटापेक्षा अधिक नसते़ तसेच ईको फ्रेंडली अशी मूर्तीही रथावर होते़ कोरोनामुक्तीसाठी मंडळ शासनासोबत आहे़
-सुनील सोनार, ज्येष्ठ पदाधिकारी श्रीमंत बाबा गणेश मंडळ, नंदुरबाऱ
यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला जाईल़ मूर्तीचा आकारही लहान असणार आहे़ स्वागत किंवा विसर्जन मिरवणूका होणार नाहीत़ ढोल पथकाची हजेरी लागणार नाही़ गर्दी होणार नाही याचीही दक्षता मंडळाकडून घेतली जाईल़
-महेंद्र फटकाळ, ज्येष्ठ पदाधिकारी पवनपुत्र युवक मंडळ, नंदुरबाऱ
जिल्ह्यात खाजगी २४० तर ५४९ सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी आहे़ जिल्ह्या ९ टप्प्यात गणेश विसर्जन करण्यात येते़ या मंडळांच्या कार्यकारिणी आणि बैठका अद्याप व्हायच्या आहेत़ शासनाने सूचना केल्यानंतर मंडळांच्या ज्येष्ठ पदाधिकाºयांनी सोशल मिडिया ग्रुपमधून त्यावर चर्चा घडवून आणली़ ज्येष्ठांसह युवा पदाधिकाºयांनी या सूचनांचा सन्मान करत गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासह आॅनलाईन दर्शन आणि आरती करण्यास प्राधान्य देण्याचे सांगितले आहे़ मानाच्या गणपतींचे आॅनलाईन दर्शनच होणार आहे़ मूर्तींचा आकार चार फुटांपर्यंतच राहिल यावरही एकमत करण्यात आल्याची माहिती मंडळांच्या पदाधिकाºयांनी दिली आहे़