१०० वर्षापासून पारंपरिक बैलगाडी बाजारही तग धरुन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:27 IST2020-02-11T13:27:13+5:302020-02-11T13:27:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : सोरापाडा येथील श्री कालिका मातेच्या यात्रोत्सवाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत़ त्यासोबत येथे होणारा ...

१०० वर्षापासून पारंपरिक बैलगाडी बाजारही तग धरुन
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : सोरापाडा येथील श्री कालिका मातेच्या यात्रोत्सवाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत़ त्यासोबत येथे होणारा ऐतिहासिक बैलबाजार आणि पारंपरिक बैल गाडींचा बाजारही फुलला असून यंत्रयुगातही बैलगाड्या खरेदीला ग्राहक येथे येत असल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे़ दरम्यान बैलबाजारात सोमवारी सात हजार बैलांची विक्री होऊन तीन कोटी रुपयांची उलाढाल झाली़
कालिका माता हे जागृत देवस्थान म्हणून परिचित आहे़ येथे दरवर्षी माघ पौर्णिमेपासून यात्रोत्सवाची परंपरा आहे़ जागृत देवस्थान असल्याने भाविकांनी पहिल्याच दिवशी शेकडोंच्या संख्येने हजेरी देत दर्शन घेतले होते़ एकीकडे भाविकांची यात्रेत गर्द वाढत असताना पारंपरिक बैलबाजारही फुलला आहे़ १०० वर्षांपूर्वी मंदिराची स्थापना झाल्यानंतर काही वर्षांनंतर येथे यात्रोत्सव आणि बैलबाजाराला प्रारंभ झाला़ सातपुड्यातील गावठी बैल शेती कामांमध्ये तरबेज व काटक असल्यामुळे त्यांच्या खरेदीसाठी येथे शेतकरी आणि व्यापारी हजेरी लावतात़ जिल्ह्यासह गुजरात राज्य व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील शेतकरी आणि व्यापारी येथे सोमवारीही दाखल झाले होते़ एवढ्या दीर्घ कालावधीनंतरही बैल बाजार आणि त्यासोबत बैलगाडी बाजार टिकून असल्याने त्या-त्या व्यावसायिकांचे व्यवसाय आजही सुरु असल्याचे चित्र यंदाही शाबूत आहे़ यांत्रिकी शेतीला प्राधान्य दिले गेल्याने बैलगाडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे़ ग्रामीण भागात शोभेची वस्तू म्हणून बैलगाडी पडून असल्याचे दिसून येते़ यातून कधीकाळी मोठी मागणी असलेल्या बैलगाडी दिसून येत नसल्याचे चित्र आहे़ मागणी कमी झाल्याने बैलगाडी तयार करणाऱ्यांचे व्यवसाय डबघाईस आले आहेत़ बºयाच यात्रोत्सवांमध्ये बैलगाडीचे बाजार पूर्णपणे बंद झाले असले तरी अक्कलकुव्यात मात्र बैलगाडी तयार करुन विक्री करण्याचा व्यवसाय तेजीत आहे़ याठिकाणी यंदाही दोन ते तीन विक्रेत्यांनी लाकडी आणि लोखंडी बैलगाड्या तयार करुन आणल्या आहेत़ या व्यवसायात स्पर्धा वाढली असल्याने बैलगाडीचे दर कमी झाले आहेत़ बैलांच्या किमतीत वाढ होत असताना बैलगाडीचे दर परवडणारे नसल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत़ यात्रेचे संयोजन श्री कालिका माता मंदिराचे विश्वस्त मंडळ करीत असून दोन दिवसात मोठ्या संख्येने याठिकाणी भाविकांनी हजेरी लावली आहे़ यात्रोत्सवासाठी अक्कलकुवा पोलीसांनी बंदोबस्त तैनात केला आहे़
सोमवारी बैलबाजारात २० हजार बैलांची आवक झाली होती़ यातून सात हजार बैलांची विक्री होऊन तीन कोटी १० हजार रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव दीपक हिरे यांनी दिली़ यातील सर्वाधिक महागडी बैलजोडी ही १ लाख १० हजार रुपयांना विक्री करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़
दरम्यान येथे एका बैलगाडीची किंमत ही २० हजार रुपयांपर्यंत आहे़ प्रामुख्याने तळोदा आणि पारोळा येथील कारागिरांनी बैलगाडी विक्रीसाठी आणल्या आहेत़ मजबूत लाकडासह लोखंडी चाके असलेल्या बैलगाडींचीही विक्री करण्यात येत आहे़ गेल्या दोन दिवसात एखाद दुसºया ग्राहकाने येथे भेट दिली असल्याचे सांगण्यात आले आहे़ येथून प्रामुख्याने गुजरात राज्यातील शेतकरी बैलगाडींची खरेदी करतात़ अद्याप त्यांनी येथे हजेरी लावतात़