98 गावांनी यंदाही जपलीय एक गाव एक गणपतीची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 13:03 IST2019-09-06T13:03:47+5:302019-09-06T13:03:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात यंदा 98 गावांनी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवत सामाजिक सलोख्याला बळ ...

The tradition of a Ganapati, a village belonging to Japali, was also followed by 98 villages | 98 गावांनी यंदाही जपलीय एक गाव एक गणपतीची परंपरा

98 गावांनी यंदाही जपलीय एक गाव एक गणपतीची परंपरा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात यंदा 98 गावांनी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवत सामाजिक सलोख्याला बळ दिले आह़े गावांची संख्या कमी असली तरी जिल्ह्यात दरवर्षी बहुतांश गावे ही परंपरा जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत़           
2 सप्टेंबरपासून गणपती बाप्पाचे आगमन झाले आह़े यामुळे उत्सवी वातावरण असून जिल्ह्यात चैतन्य निर्माण झाले आह़े यंदा पोलीस दलाकडून गणेशोत्सवापूर्वी घेण्यात आलेल्या शांतता कमिटय़ांच्या बैठकीत सर्व 12 पोलीस ठाणे हद्दीत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यावर भर देण्याचे सुचवण्यात आले होत़े परंतू यात मोजक्याच 98 गावांनी सहभाग नोंदवला असून त्याठिकाणी सध्या धडाक्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात आह़े जिल्ह्यात यंदा 115 गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्याचे नियोजन होत़े परंतू तांत्रिक अडचणींमुळे काही गावांनी उपक्रम पूर्ण होऊ शकलेला नाही़ या गावांकडून पुढच्या वर्षी बाप्पाचा उत्सव धडाडीने साजरा करणार असल्याचे पोलीस विभागाला कळवले होत़े यंदा सर्वाधिक एक गाव एक गणपती हे नवापुर तालुक्यात असून त्याखालोखाल शहादा आणि तळोदा तालुक्यात उत्सव साजरा करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े 

नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे हद्दीनिहाय 6, तालुका पोलीस ठाणे 2, नवापुर 19, विसरवाडी 23, शहादा 3, सारंगखेडा 4, म्हसावद 14, धडगाव 5, अक्कलकुवा 8, तळोदा 12 आणि मोलगी पोलीस ठाणे हद्दीत दोन ठिकाणी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यात आली आह़े या गावांमध्ये ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, गावातील ज्येष्ठ महिला आणि पुरुष, युवक यांच्यासह नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहणारे मूळ रहिवासी यांच्या उपस्थितीत विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रम घेण्यात येत आहेत़ 
जिल्हाभरात यंदा 680 सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पाची स्थापना केली आह़े यात एक गाव एक गणपतीचाही समावेश आह़े पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने स्थापना करण्यात आलेल्या एक गाव उपक्रमातील बाप्पाची टप्प्याटप्प्याने विसजर्न करण्यात येणार आह़े  गेल्यावर्षी 680 गणेश मंडळांनी गेल्यावर्षाच्या तुलनेत गणेश मंडळांची संख्या वाढली असल्याने पोलीस प्रशासनाचेही काम वाढल्याचे सांगण्यात आले आह़े यात ग्रामीण भागात टिकून असलेल्या या एक गाव एक गणपती या उपक्रमामुळे ताण काहीसा कमी झाला आह़े 

शहादा तालुक्यातील कवठळ या छोटय़ाश गावात गत सात वर्षापासून पटेल गणेश मंडळाकडून एक गाव एक गणपती ही संकल्पना यशस्वीपणे राबवली जात आह़े गावातील ज्येष्ठांच्या सहकार्याने युवकांनी हा उपक्रम सातत्याने राबवला आह़े मंडळाकडून वृक्षलागवड, रक्तदान शिबिर, बेटी बचाव बेटी पढाव आणि जलसंधारणांच्या कामांचे नियोजन करण्यात येत़े ग्रामस्थांकडून देण्यात आलेल्या सहभागाचा चांगल्या पद्धतीने विनिमय व्हावा म्हणून उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यावर भर दिला जातो़ कमीत कमी खर्च करुन लोकोपयोगी कामासाठी निधी वापरण्यात येतो़ यांतर्गत गत सात वर्षात गावातील गोरगरीब विद्याथ्र्याना शालेय साहित्य वाटप करण्यावर भर देण्यात आला आह़े उत्सवानंतर रकमेचा हिशोब देऊन त्यावर चर्चाही केली जात़े 
 

Web Title: The tradition of a Ganapati, a village belonging to Japali, was also followed by 98 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.