The tradition of celebrating Gudipadva for the first time in Mandane village is broken | मंदाणे गावात प्रथमच गुढीपाडवा साजरा करण्याची परंपरा खंडित

मंदाणे गावात प्रथमच गुढीपाडवा साजरा करण्याची परंपरा खंडित

हिंदू संस्कृतीत गुढीपाडवा हा पारंपरिक सण व मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी गुढी उभारून साजरा करण्याची परंपरा प्रारंभीपासूनच आजतागायत कायम आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीने सर्वांचे जीवन धोक्यात आले आहे. या महामारीने आतापर्यंत अनेकांचा जीव घेतला आहे. मंदाणे गावात या दोन महिन्यांच्या काळात प्रत्येक परिवारात कोणी ना कोणी या महामारीने बळी घेतल्याने संपूर्ण गाव शोकमग्न आहे. अनेक जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे सर्वांचा जीव मुठीत आहे. कोणाची केव्हा दुःखद बातमी येईल, याचा भरोसा नसल्याने ग्रामस्थ सुन्न झाले आहेत. लाखो रुपये खर्च करूनही अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुढीपाडवा हा पारंपरिक पवित्र सण सगळीकडे उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडवा यादिवशी साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त मानला जात असल्याने व नवीन वर्षारंभ असल्याने खरेदी-विक्री करणे, नवीन व्यवसायाची सुरुवात केली जाते. त्यामुळे सर्वत्र उत्साह असतो. मात्र, कोरोना महामारीने आतापर्यंत अनेकांचा जीव घेतला आहे. गुढीपाडवा हा सण साजरा न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने घेतल्याने गावात सर्वत्र दुःखाचे सावट पसरले आहे.

Web Title: The tradition of celebrating Gudipadva for the first time in Mandane village is broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.