ट्रॅक्टरचे टायर फुटून अपघात, एकजण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 12:04 IST2020-05-10T12:04:25+5:302020-05-10T12:04:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव ट्रॅक्टरचे टायर फुटून ट्रॅक्टर उलटल्याने एकजण ठार झाल्याची घटना लोय, ता.नंदुरबार येथे घडली. ...

ट्रॅक्टरचे टायर फुटून अपघात, एकजण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भरधाव ट्रॅक्टरचे टायर फुटून ट्रॅक्टर उलटल्याने एकजण ठार झाल्याची घटना लोय, ता.नंदुरबार येथे घडली. मयत हा शेतमजूर असून उपनगर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
मनेश वसंत वळवी (३१) रा.लोय, ता.नंदुरबार असे मयताचे नाव आहे. मनेश हा त्यांच्या ट्रॅक्टरने (क्रमांक एमएच ३९-एफ ३८५) शिवपूरकडे मुरूम घेण्यासाठी जात होता. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ट्रॅक्टरचे टायर अचानक फुटले. यामुळे भरधाव ट्रॅक्टर उलटले. त्यात दाबला जावून आणि लोखंडी अँगल त्याच्या डोक्याला लागून गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. वसंत धिरजी वळवी, रा.लोय यांच्या फिर्यादीवरून नोंद करण्यात आली.