ट्रॅक्टर चोर रंगेहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 11:54 IST2019-05-30T11:54:35+5:302019-05-30T11:54:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गावालगत रस्त्यावर उभे केलेले ट्रॅक्टर व मशागतीचे यंत्र चोरून नेणा:यास कोठडा, ता.नवापूर येथे रंगेहात ...

Tractor Chor Tengte | ट्रॅक्टर चोर रंगेहात

ट्रॅक्टर चोर रंगेहात

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गावालगत रस्त्यावर उभे केलेले ट्रॅक्टर व मशागतीचे यंत्र चोरून नेणा:यास कोठडा, ता.नवापूर येथे रंगेहात पकडण्यात आले.  
शैलेश बावा गावीत, रा.कुकराण, ता.नवापूर असे संशयीताचे नाव आहे. कोठडा गावाच्या बाहेर दोन लाख रुपये किंमतीचे ट्रॅक्टर व 30 हजार रुपये किंमतीची शेत सपाटीकरणासाठी लागणारे यंत्र अर्थात सुपडी लावली होती. शैलेश बावा गावीत याने 28 रोजी अडीच वाजता ते चोरून नेण्याचा प्रय} केला. याचा सुगावा लागल्यावर ते रंगेहात सापडले. याबाबत नवापूर पोलीस ठाण्याचे जमादार कृष्णा पवार यांनी फिर्याद दिल्याने शैलेश गावीत यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार पवार करीत आहे. 
 

Web Title: Tractor Chor Tengte