सुरपाळ-अजिपाळ यात्रोत्सवानिमित्त भाविकांनी घेतला पर्यटनाचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 12:10 IST2018-11-13T12:10:44+5:302018-11-13T12:10:49+5:30
आष्टे : : नंदुरबार व नवापूर तालुक्याच्या सिमेवरील सुरपाळ-अजिपाळ यात्रोत्सवानिमित्ताने या भागातील नयनरम्य परिसराचा भाविकांनी आनंद घेतला. दिवाळीत चार ...

सुरपाळ-अजिपाळ यात्रोत्सवानिमित्त भाविकांनी घेतला पर्यटनाचा आनंद
आष्टे : : नंदुरबार व नवापूर तालुक्याच्या सिमेवरील सुरपाळ-अजिपाळ यात्रोत्सवानिमित्ताने या भागातील नयनरम्य परिसराचा भाविकांनी आनंद घेतला.
दिवाळीत चार ते पाच दिवस चालणा:या यात्रेत आमसरपाडा, खोलघर, हनुमंतपाडा, वांझळे, अजेपूर, केवडीपाडा, सुतारे, अंबापूर, घोगळपाडा, वाघाळे, घोगळगाव, विटावे, वाल्हवे, तलावपाडा, नावली, मोग्राणी, खोलविहीर, अशा अनेक गावातील भाविक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
यंदाही परंपरेनुसार दिवाळीत देवाची पूजा करून संपूर्ण जीवजंतुच्या, पशु-पक्षी, शेतशिवार, पोराबाळांचे कल्याण, चांगला पाऊस व्हावा, दुष्काळ पडू नये यासाठी भाविकांनी देवापुढे आवळणी घातली.
यात्रोत्सवात भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी आमसरपाडा, हनुमंतपाडा, खोलघर व वांझळे येथील गावपंचांनी ठरविल्यानुसार लोकसहभागातून निधी गोळा करीत मंदिराचे काम सुरू केले आहे. यासाठी सरपंच ताईबाई कामडे, माजी सरपंच तुळशिराम जगताप, आमसरपाडय़ाचे पोलीस पाटील लालसिंग चौधरी, पोलीस पाटील श्रीकांत चौधरी, धर्मा चौरे, श्रावण जगताप, माजी सैनिक चिंतामण कामडे, राजू कामडे, चिंतामण गवळी, चंदू कोकणी, धरमदास चौरे, ज्योतिसिंग पवार, नोकरदार वर्ग यांनी नियोजन करून रस्ते, पाण्याची सोय, भाविकांसाठी मंडप, विविध साहित्यांची दुकाने, परिसर स्वच्छता व भाविकांच्या सोयीसाठी स्वयंसेवक, भाविकांना डोंगरावर चढण्याकरीता पाय:या तयार करण्याचा प्रयत्न केला.
यातून सर्वाना शुद्ध व थंड पाणी मिळावे म्हणून अॅड.प्रकाश गांगुर्डे, ढोंग सांगाळी सरपंच देवा कोकणी, राजू ब्रिजलाल चौरे, पार्क्ीगसाठी शेत रिकामे करणारे चुणिलाल ठाकरे, राजू चौरे यांनी स्वत:हून यात्रेकरूंची सेवा केली. यानंतर आमसरपाडा, खोलघर, हनुमंताडा, वांझळे येथील ग्रामस्थ व पदाधिका:यांनी बैठक घेवून मंदिराचे उर्वरित कामांबाबत चर्चा केली.