चाकूचा धाक दाखवत बोरवणला युवतीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 12:10 IST2019-04-17T12:09:36+5:302019-04-17T12:10:06+5:30

नंदुरबार : बोरवण ता़ धडगाव येथे चाकूचा धाक दाखवत युवतीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ १५ फेब्रुवारी रोजी ...

Torture on a young woman barking a knife | चाकूचा धाक दाखवत बोरवणला युवतीवर अत्याचार

चाकूचा धाक दाखवत बोरवणला युवतीवर अत्याचार

नंदुरबार : बोरवण ता़ धडगाव येथे चाकूचा धाक दाखवत युवतीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ १५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता ही घटना घडली होती़
बोरवण येथील १८ वर्षीय युवती घरात एकटी असताना टायगर ऊर्फ कोक्या कोपा पावरा रा़ बोरवण याने घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला़ त्याने युवतीला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार करुन ठार मारण्याची धमकी दिली़ युवतीने ही घटना कुटूंबियांना सांगितले होते़ त्यांनी गावपंचाकडे तक्रार केली होती़ परंतू सामोपचाराने न मिटल्याने अखेरीस युवतीने पोलीस ठाण्यात माहिती दिली़ याबाबत युवतीच्या फिर्यादीवरुन टायगर ऊर्फ कोक्या पावरा याच्याविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस निरीक्षक ए़सी़मोरे करत आहेत़

Web Title: Torture on a young woman barking a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.