लग्नाचे अमिष दाखवून युवतीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:09 IST2019-05-08T12:08:44+5:302019-05-08T12:09:22+5:30
फिर्याद : उमरकुवा येथील घटना

लग्नाचे अमिष दाखवून युवतीवर अत्याचार
नंदुरबार : लग्नाचे अमिष दाखवून युवतीवर एकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उमरकुवा ता़ अक्कलकुवा येथे घडली़ युवती गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उडघकीस आला़
उमरकुवा येथील युवतीसोबत काकडीआंबा येथील सोहम दिलीप पाडवी याने दोन ते तीन वर्षांपासून शारिरिक संबध बनवले होते़ विवाह करण्याचे अमिष देत तो युवतीवर वेळावेळी अत्याचार करत होता़ दरम्यान त्याने विवाहास नकार दिल्याची माहिती आहे़ यातून युवती २ महिन्याची गर्भवती झाली होती़ ही बाब तिच्या कुटूंबियांना समजल्यानंतर त्यांनी पोलीसात धाव घेतली होती़ युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित आरोपी सोहम पाडवी याच्याविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत़