विवाहाचे अमिष दाखवत नंदुरबारातील युवतीवर मुंबईत अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 12:04 IST2019-03-13T12:03:44+5:302019-03-13T12:04:11+5:30

पिडितेची फिर्याद : चौघांविरोधात गुन्हा

Torture in Mumbai on Nandurbar's maiden showing marriage with Amish | विवाहाचे अमिष दाखवत नंदुरबारातील युवतीवर मुंबईत अत्याचार

विवाहाचे अमिष दाखवत नंदुरबारातील युवतीवर मुंबईत अत्याचार

नंदुरबार : विवाहाचे अमिष दाखवून ३० वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार मुंबई येथे घडला होता़ याप्रकरणी युवतीने फिर्याद दिल्यानंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़
दुधाळे शिवारातील ३० वर्षीय युवती नोकरीनिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहे़ दरम्यान नोव्हेंबर २०१८ मध्ये तिची भेट शमोवेल सुकलाल गावीत रा़ देवळीपाडा ता़ नवापूर हल्ली मुक्काम मुंब्रा कॉलनी, मुंबई याच्यासोबत झाली होती़ यातून शॅमोवेल याने विवाहाचे अमिष दाखवत फेब्रुवारी २०१९ पर्यंत युवतीवर लैंगिक अत्याचार केले होते़ विवाहाची विचारणा केल्यावर शॅमोवेल याने विवाहास नकार दिल्यानंतर पिडित युवतीने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़
यानुसार शॅमोवेल गावीत याच्यासह त्याचे आई वडील व भाऊ पिंट्या ऊर्फ अनिल याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक बैसाणे करत आहेत़

Web Title: Torture in Mumbai on Nandurbar's maiden showing marriage with Amish