Torture of a married woman in Taloda | तळोदा येथील विवाहितेचा छळ

तळोदा येथील विवाहितेचा छळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तळोदा येथील जामा मशिद परिसरातील माहेर तर चांदिवली मुंबई येथील सासर असलेल्या विवाहितेचा पतीसह त्याच्या कुटूंबियांकडून हुंड्यासाठी छळ केल्याने गुन्हा दाखल झाला आहे.
हिनाबी शेख इमरान मण्यार यांचा विवाह चांदिवली येथील शेख इमरान शेख सिंकदर मन्यार याच्यासोबत झाला होता़ विवाहानंतर जून २०२० पासून इमरान हा पत्नी हिनाबी हिचा छळ करत होता़ माहेरुन हुंडा मिळाला नाही म्हणून तिला शारिरिक व मानसिक त्रास देत होता़ मंगळवारी तळोदा पोलीस ठाणे गाठत विवाहितेने सासरच्यांविरोधात फिर्याद दिली आहे़ फिर्यादीनुसार पती शेख इमरान, सासू रईसाबी सिकंदर शेख, सासरा शेख सिकंदर शेख गणी, शबीनाबी शेख आरीफ, आरीफ सिकंदर शेख सर्व रा़ चांदिवली यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस हवालदार मोरे करत आहेत़

Web Title: Torture of a married woman in Taloda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.