तळोदा तालुक्यात मरणानंतरही भोगाव्या लागताय यातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 18:15 IST2019-02-24T18:14:37+5:302019-02-24T18:15:06+5:30

तळोदा तालुका : स्मशानभुमिच्या जागेसह इतर सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात

Torture to be born in Taloda taluka even after death | तळोदा तालुक्यात मरणानंतरही भोगाव्या लागताय यातना

तळोदा तालुक्यात मरणानंतरही भोगाव्या लागताय यातना

सोमावल/बोरद : तळोदा तालुक्यातील गाव पाड्यांमध्ये स्मशानभुमिसाठी जागा उपलब्ध नसल्याने तसेच यासाठीचे प्रस्ताव रखडल्याने येथे मरणानंतरही अनेक यातना सोसाव्या लागत आहे़ संबंधित प्रशासनाने स्मशानभुमिसाठी जागा उपलब्ध करुन ही समस्या सोडवावी अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थ करीत आहेत़
तळोदा तालुक्यातील खुषगव्हाण, धवळीविहिर, इच्छागव्हान, तळवे, सिलिंगपूर, छोटा धनपूर आदींसह अनेक गावांचे जिल्हा वार्षिक जनसुविधा योजनेंतर्गत स्मशानभुमिचे अनेक प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्रलंबित आहे़ त्यामुळे अनेक गावांमध्ये अंत्यविधी गावाबाहेरील एखाद्या निर्मनुष्य जागी करावा लागत आहे़ त्यामुळे अनेक वेळा ग्रामस्थांचे हाल होत असतात़ प्रशासनाने याकडे लक्ष देऊन स्मशानभुमिची कामे त्वरीत पूर्ण करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे़ दरम्यान, स्मशानभुमिचे शेड बांधणे, हातपंप, अमरधाम करणे, स्मशानभुमिसाठी संरक्षण भिंती उभारणे, अमरधामपर्यंत जाण्यासाठी एक किमीपर्यंतचा रस्ता तयार करणे, रस्त्यावर काँक्रीटीकरण करणे आदी विविध कामे तळोदा तालुक्यात रखडलेले आहेत़ त्यामुळे साहजिकच मरणानंतरसुध्दा प्रशासकीय अनास्थेमुळे यातना भोगाव्या लागत आहे़ तळोदा तालुक्यातील लोभाणी येथून स्मशानभुमिसाठी प्रस्तावच पाठविण्यात आला नसल्याची माहिती शासकीय सूत्रांकडून मिळाली आहे़ त्यामुळे येथे मिळेल त्या जागी अंत्यविधी उरकवण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे़ जागेअभावी झाडाखाली अंत्यविधी होत असल्याने पर्यावरणप्रेमींकडूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ तसेच गावाबाहेर अंत्यविधीसाठी जात असताना अनेक खाचखळग्यातून रस्ता काढावा लागत असतो़ त्यामुळे ग्रामस्थांची तसेच मृतांच्या आप्तेष्टांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते़ त्यामुळे स्मशानभुमिच्या जागेसह इतर सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी होत आहे.येथील स्मशानभूमीत लोभाणी तसेच पूर्वी लोभणीचा पाडा म्हणून ओळख असलेल्या गव्हाणीपाडा येथे मयत झालेल्या व्यक्तींचादेखील अंत्यविधी होत असतो. गावाचा लोकसंख्येमुळे अंत्यविधीसाठी स्मशानभूमीची जागा व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आह

Web Title: Torture to be born in Taloda taluka even after death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.