धडगाव तालुक्यातील गोराडी येथील १५ वर्षीय वेडसर युवतीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 11:50 IST2019-04-27T11:50:18+5:302019-04-27T11:50:49+5:30
पोलीसात गुन्हा दाखल : अज्ञात व्यक्तीचे कृत्य

धडगाव तालुक्यातील गोराडी येथील १५ वर्षीय वेडसर युवतीवर अत्याचार
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील गोराडी येथे वेडसर १५ वर्षीय अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे़ अत्याचारातून गर्भधारणा झाल्याने हा प्रकार समोर आला़
गोराडी येथील १५ वर्षीय युवती ही वेडसर असल्याने घरगुती कामांसह शेतातील कामांमध्ये कुटूंबियांना मदत करत होती़ चार ते पाच महिन्यांपूर्वी युवती गोराडी शिवारात गुरे चारण्यासाठी गेली असता, अज्ञात व्यक्तीने तिच्यासोबत जबरीने शारिरिक संबध ठेवले होते़ यातून तिला गर्भधारणा झाली़ ही बाब तिच्या कुटूंबियांना लक्षात आल्यानंतर त्यांनी रुग्णालयात दाखल करुन तपासणी केली होती़ रुग्णालयाने अहवाल दिल्यानंतर युवतीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले़ याबाबत युवतीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक एस़व्ही़ दहिफळे करत आहेत़
दरम्यान युवतीवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे़ तसेच या प्रकरणातील दोषीचा पोलीसांकडून शोध घेतला आहे़ घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे़