तळोद्यात एकावर तलवारीने वार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 20:47 IST2018-02-26T20:47:49+5:302018-02-26T20:47:49+5:30

In Torsod, one was killed by a sword, both of them filed a complaint | तळोद्यात एकावर तलवारीने वार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

तळोद्यात एकावर तलवारीने वार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : किरकोळ कारणावरून एकावर तलवारीने वार करून जखमी केल्याची घटना तळोदा येथे स्मारक चौकात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंडय़ा अशोक मोरे व मुकेश कालुसिंग ठाकरे यांच्यात मागील भांडणावरून वाद होता. रविवारी ते स्मारक चौकात समोरासमोर आल्यावर त्यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. मुकेश कालुसिंग ठाकरे व राकेश कालुसिंग ठाकरे या दोन्ही भावंडांनी बंडय़ा मोरे याला गाठून वाद घातला. त्यानंतर दोघांनी तलवार आणि काचेच्या फुटलेल्या बाटलीने बंडय़ावर वार केले. तो गंभीर जखमी झाला. हा प्रकार घडत असतांना स्मारक चौकात भितीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी वेळीच पोहचल्याने तणाव निवळला.
याबाबत बंडय़ा ठाकरे यांच्या फिर्यादीवरून मुकेश व राकेश ठाकरे या दोन्ही भावंडांविरुद्ध तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक वाघमारे व जमादार दाभाडे करीत आहे.

Web Title: In Torsod, one was killed by a sword, both of them filed a complaint