भरघोस उत्पन्न देणारे आजवान उत्पादक शेतकरी उपेक्षीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 11:55 IST2020-02-09T11:55:18+5:302020-02-09T11:55:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दैनंदिन आहारात आणि आयुर्वेदात महत्त्व असलेल्या ओवा अर्थात आजवान पीक शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न देवून ...

भरघोस उत्पन्न देणारे आजवान उत्पादक शेतकरी उपेक्षीत
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दैनंदिन आहारात आणि आयुर्वेदात महत्त्व असलेल्या ओवा अर्थात आजवान पीक शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न देवून जाते. उत्तर महाराष्टÑात केवळ नंदुरबार तालुक्यातच या पिकाचे उत्पादन घेतले जाते. नंदुरबारात स्थानिक ठिकाणी ओवा अर्थात आजवान खरेदी करणारे व्यापारी नसल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात विक्री करावी लागत असल्याचे चित्र आहे. नंदुरबार बाजार समितीत सध्या ४०० क्विंटल आवक सुरू असून केवळ दोन व्यापारी खरेदीदार आहेत.
खाद्य पदार्थ रुचकर बनविण्यासाठी आजवानचा मोठा वापर केला जातो. पाचक आणि आयुर्वेदात महत्वाचे स्थान असलेल्या आजवानचे पीक हे ठराविक ठिकाणीच घेतले जाते. त्यासाठी मध्यम आणि हलकी जमीन लागते. पाण्याचे प्रमाण देखील मध्यम स्वरूपाचे लागते. रब्बी हंगामात गहू आणि हरभरा पिकासोबत आजवानचेही उत्पादन घेण्याची प्रथा नंदुरबार तालुक्यातील पश्चिम भागात व नवापूर तालुक्यात आहे. अर्थात धानोरा, खांडबारा या भागात आजवानचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
अत्यल्प खर्च, भाव चांगला
आजवानला हेक्टरी २५ ते ४० हजार रुपये खर्च येतो. उत्पादन हेक्टरी ८ ते ९ क्विंटल होत असते. रब्बी हंगामात गहू व हरभरा पिकाच्या सोबत याचे उत्पादन घेतले जाते. साधारणत: साडेतीन ते साडेचार महिन्याचे हे पीक आहे. आजवानला सरासरी ८ ते १८ हजार रुपये क्विंटल असा भाव मिळतो. सध्या नंदुरबारच्या बाजारात १४ हजार रुपये क्विंटल असा भाव मिळत आहे. सरासरी दिवसाची आवक ही ४०० क्विंटलपर्यंत जात आहे. येत्या काळात ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
यंदा वारंवार बदलणारे तापमान, अवकाळी पाऊस यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. तरीही गेल्या वर्षाच्या तुलनेत सरासरी उत्पादकता आल्याची माहिती हे पीक घेणाºया काही शेतकºयांनी दिली.
खरेदीदार कमी
आजवान अर्थात ओवा पिकांचे खरेदीदार व्यापारी फारच कमी आहेत. नंदुरबार बाजार समितीत दोनच व्यापारी ओवा खरेदी करीत असतात. खरेदीदारांमधील स्पर्धा नसल्यामुळे ओवा उत्पादक शेतकºयांना मिळेल त्या भावात त्या विक्री कराव्या लागतात. मध्यंतरी १५ दिवस खरेदीदारच नसल्याने ओवा विकणाºया शेतकºयांची फारच परवड झाली होती.
विदर्भात सद्य स्थितीत १२ ते १८ हजार रुपये क्विंटल भाव सुरू आहेत. नंदुरबारात मात्र कमीत कमी १२ व जास्तीत जास्त १४ हजार रुपये क्विंटल भाव मिळत असल्याचे चित्र आहे. एकुणच कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाºया या पिकाकडे अद्यापही शेतकरी वळले नाहीत, त्यांना कृषी विभागाकडून अपेक्षीत मार्गदर्शन देखील मिळत नसल्याची स्थिती आहे.
४आजवानचे पीक राज्यात मोजक्याच ठिकाणी घेतले जाते. त्यात नंदुरबार तालुक्याचा समावेश आहे. राज्यात अकोला, बुलढाणा, अमरावती व वाशिम जिल्ह्यातील मोजक्याच भागात हे पीक घेतले जाते. राजस्थान आणि हरियाणा राज्यात या पिकाचे क्षेत्र अधीक आहे. परिणामी खरेदीदार मिळत नाहीत आणि अपेक्षीत भावही मिळत नसल्याची स्थिती आहे. नंदुरबार भागातील शेतकºयांना याबाबत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.