पीक विम्याच्या त्रुटय़ा टाळण्याच्या सुचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 13:06 IST2019-11-02T13:06:44+5:302019-11-02T13:06:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदाच्या खरीप हंगामात विमाधारक शेतक:यांना नुकसानीचा अथोचित लाभ मिळावा यासाठी संबंधित बॅँक व विमा ...

पीक विम्याच्या त्रुटय़ा टाळण्याच्या सुचना
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : यंदाच्या खरीप हंगामात विमाधारक शेतक:यांना नुकसानीचा अथोचित लाभ मिळावा यासाठी संबंधित बॅँक व विमा कंपन्यांमार्फत प्रस्तावात त्रुटय़ा राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना सहकारी बॅँकांना देण्यात आल्या आहेत.
शासनामार्फत राबविण्यात येणा:या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश शेतक:यांचा समावेश आहे. मागील नुकसानग्रस्त शेतक:यांपैकी बहुतांश शेतक:यांना लाभ मिळाला नाही, लाभ मिळालेल्या शेतक:यांना उशिरा बिम्याची रक्कम मिळाली. अशा समस्या निर्माण झाल्या होया. त्या चुकीचे आधार, त्यातच बॅँक खाते व मोबाईलचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे विमाधारक शेतक:यांना वेळेवर व योग्य लाभ मिळाला नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले.
ऑनलाईन अर्ज करतानां होणा:या चुकांमुळे शेतक:यांना लाभ मिळत नसल्याने यंदाच्या खरीप हंगामात होऊ नये, म्हणून काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अतिवृष्टी व ऑक्टोबर महिना उलटूनही पाऊस बंद झाला नसून संपूर्ण जिल्ह्यातील शेतक:यांचे मोठे नुकसान झाले आहेत. त्यात जवारी, मका, बाजरी, सोयाबिन, कापूस, उडीद, मूग भात यांचा सर्वाधिक समावेश आहे. या पिकांची नुकसानीबद्दल विम्याच्या माध्यमातून योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी याग्य कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या वर्षी सर्वाधिक पीकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक:यांनी संबंधित नुकसानीबाबत 48 तासात कृषी विभागाकडे सूचना देणे गरजेचे असल्याचे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले आहे.