रांझणी ग्रा.पं.तर्फे विद्याथ्र्यांना ‘स्पोर्ट कीट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:41 IST2019-07-28T12:41:03+5:302019-07-28T12:41:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी येथील जिल्हा परिषद शाळेत रांझणी ग्रामपंचायतीकडून पेसा अंतर्गत सर्व विद्याथ्र्याना स्पोर्ट ...

रांझणी ग्रा.पं.तर्फे विद्याथ्र्यांना ‘स्पोर्ट कीट’
लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी येथील जिल्हा परिषद शाळेत रांझणी ग्रामपंचायतीकडून पेसा अंतर्गत सर्व विद्याथ्र्याना स्पोर्ट कीट वाटप करण्यात आले.
या वेळी सरपंच मनिषा ठाकरे, उपसरपंच अश्विनी गोसावी, ग्रामपंचायत सदस्य यशवंत मराठे, पेसा अध्यक्ष कृष्णा ठाकरे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश मोरे, ग्रामपंचायत सदस्य उषाबाई गावीत, ग्रामसेवक मुकेश कापुरे, विजय ठाकरे उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुरेश जाधव यांनी रांझणी ग्रामपंचायतचे आभार मानत असेच सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमासाठी शिक्षिका कविता बोरसे, शीतल शेवाळे, निलोफर शेख यांच्यासह कर्मचा:यांनी परिश्रम घेतले.
शाळांची गुणवत्ता टिकून
स्पोर्ट कीट वाटप कार्यक्रमात ग्रामसेवक मुकेश कापुरे यांनी आजही जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता टिकून असल्याचे सांगत यात जिल्हा परिषद शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगत आपल्या पाल्यांचे प्रवेश जिल्हा परिषद शाळात करण्याचे आवाहन केले.
चिमुकल्यांना विशेष आनंद
दरम्यान, रांझणी ग्रामपंचायतीकडून स्पोर्ट कीटचे चिमुकल्यांना वाटप करण्यात आल्यामुळे या विद्याथ्र्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता व सर्व जिल्हा परिषद शाळा एकाच वेशात दिसून आली.