नंदुरबार आगारात ईटीआय मशीनअभावी कंडक्टरांवर तिकीट कापण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:05 IST2021-09-02T05:05:36+5:302021-09-02T05:05:36+5:30
प्राप्त माहितीनुसार नंदुरबार आगाराला एसटी महामंडळाकडून २७० ईटीआय मशरन देण्यात आल्या होत्या. या मशीनचा वापर करून प्रवाशांना तिकीट देणे ...

नंदुरबार आगारात ईटीआय मशीनअभावी कंडक्टरांवर तिकीट कापण्याची वेळ
प्राप्त माहितीनुसार नंदुरबार आगाराला एसटी महामंडळाकडून २७० ईटीआय मशरन देण्यात आल्या होत्या. या मशीनचा वापर करून प्रवाशांना तिकीट देणे सोयीस्कर ठरत होते; परंतु आगारातील ७० टक्के मशिन्स खराब झाल्याने वेळोवेळी ईटीआय मशीन पुरवठा करणाऱ्या कंपनीकडे पाठवण्यात येत आहेत. याठिकाणी दुरुस्ती होऊन मशीन येणे अपेक्षित आहे; परंतु १० मशीन पाठवल्या तर एखाद दुसरीच दुरुस्त होऊन येत असल्याचे प्रकार घडत आहेत. परिणामी नाशिक, धुळे, शहादा, तळोदा यासह विविध मार्गांवर चालणाऱ्या बसमधून कंडक्टर जुन्या पद्धतीने तिकिटांचे वाटप करत आहेत.
दरम्यान, आगाराकडून या तिकिटांचा पुरवठाही योग्य पद्धतीने केला जात नसल्याची माहिती समोर आली असून, तपासणी पथकाकडून मात्र तिकिटे योग्य पद्धतीने वाटली नाहीत, म्हणून वाहकांवर कारवाईचे सत्र सुरू आहे.
धुळ्याच्या पथकाकडूनही पाहणी
नंदुरबार आगारातील ७० टक्के मशिन्स बंद असल्याची माहिती मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात मिळाल्यानंतर त्यांनी धुळे विभागात माहिती दिल्यानंतर येथील ईटीआय मशिन्सची तपासणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.