पुरात वाहून जाणाऱ्या बालकाच्या बचावाचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 12:50 IST2020-08-26T12:50:07+5:302020-08-26T12:50:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहिर : सातपुड्यातील देव नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या बालकासह गुरांना वाचवण्याचा थरार नागरिकांना सोमवारी सायंकाळी अनुभवण्यास ...

पुरात वाहून जाणाऱ्या बालकाच्या बचावाचा थरार
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहिर : सातपुड्यातील देव नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या बालकासह गुरांना वाचवण्याचा थरार नागरिकांना सोमवारी सायंकाळी अनुभवण्यास मिळाला़ ओहवापाडा येथील ग्रामस्थांनी मोठ्या हिमतीने हे बचाव कार्य केले होते़
सातपुड्याच्या दुर्गम भागातील ओहवापाडा गोरजाबारी येथील कांत्या सांगल्या वसावे हा मुलगा दिवसभर गुरे चारून सायंकाळी घरी निघाला होता़ गोरजाबारीकडे जाताना रस्त्यात नदीचे पाणी कमी असल्याने त्याने गुरांसह पाण्यात मार्ग काढला़ दरम्यान अचालक पाणीपातळभ वाढून तो गुरांसह वाहून जावू लागला़ यामुळे त्याने आरडाओरड करण्यास सुरूवात केली़ प्रसंगी बोदा अजमा तडवी,अमरसिग धर्मा पाडवी, किर्ता खेमा वसावे, बोल्या ओजमा तडवी, गोया खेमा वसावे, ओल्या खेमा वसावे, बोंडा बिरमा वसावे, ईश्वर धर्मा पाडवी, हिरालाल धर्मा पाडवी सर्व रा़ ओहवापाडा हे हजर यांनी नदीत उड्या टाकून वाहून गेलेल्या गुरांना आणि बालकाला बाहेर काढले़
बुडत्या मुलाला आणि गुरांला वाचवण्यासाठी नदीच्या पाण्यात कडे करत त्यांनी बचाव केला़ सुमारे अर्धा तासाच्या परिश्रमानंतर गुरांना बाहेर काढण्यात आदिवासी बांधवांना यश आले होते़
कांत्या वसावे हा घरी जात असताना त्याच्या मागेच काही अंतरावर बाजार करुन परत येणारे बांधव होते़ कांत्या बुडत असल्याचे दिसून आल्यानंतर सर्वांनी हातातील साहित्य फेकून देत नदीत उड्या घेतल्या़ याबाबत ‘लोकमत’ रविवारीच वृत्त प्रकाशित करुन वास्तव चित्र समोर आणले होते़ त्याच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी ही घटना घडली़