अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एकास तीन वर्ष कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 12:35 IST2019-12-22T12:35:33+5:302019-12-22T12:35:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवैध दारू वाहतुक केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने नेपाळच्या एका आरोपीस तीन वर्षांचा कारावास व ...

अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एकास तीन वर्ष कारावास
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अवैध दारू वाहतुक केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने नेपाळच्या एका आरोपीस तीन वर्षांचा कारावास व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा शहादा न्यायालयाने ठोठावली आहे.
नाशिक विभागीय भरारी पथकाने ९ जानेवारी २०१९ रोजी ही कारवाई केली होती. शहादा-दोंडाईचा रस्त्यावर पेट्रोलपंपनजीक ही कारवाई करण्यात आली होती. पथकाने परराज्यात निर्मित व महाराष्टÑात विक्रीस प्रतिबंधीत मद्यसाठा घेवून जाणारा ट्रक (क्रमांक पी.बी.१३ एएल २६७२) अडवून त्याची झडती घेतली असता दारूसाठा आढळला सुभाष राजू थापा, रा.गडकीअंचल, नेपाळ याला अटक करून त्याच्याकडून वाहनासह एकुण एक कोटी २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
शहादा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यापुढे हा खटला चालला. न्यायालयाने तीन वर्षांचा कारावास व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे बागुल यांनी काम पाहिले.
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत नोंदविलेल्या गुन्ह्यात खटला चालून एक वर्षाच्या आत शिक्षा सुनावण्याचे हे पहिले प्रकरण घडले.