जिल्ह्यातून एकाच दिवशी तीन दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:10 IST2021-02-05T08:10:48+5:302021-02-05T08:10:48+5:30
नंदुरबार : जिल्ह्यातून तीन दुचाकी लंपास झाल्याची घटना घडली. खांडबारा, शहादा, धडगाव येथे घटना घडल्या. दरम्यान, दुचाकी चोरीच्या घटनांची ...

जिल्ह्यातून एकाच दिवशी तीन दुचाकी लंपास
नंदुरबार : जिल्ह्यातून तीन दुचाकी लंपास झाल्याची घटना घडली. खांडबारा, शहादा, धडगाव येथे घटना घडल्या. दरम्यान, दुचाकी चोरीच्या घटनांची मालिका सुरूच असून यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
खांडबारा, ता. नवापूर येथील सरकुल गुुलाबसिंग गौंड या साडी विक्रेत्याने आपली दुचाकी खांडबारा बसस्थान परिसरात उभी केली होती. चोरट्यांनी ती लंपास केली. ठिकठिकाणी शोध घेतला असता मिळून आली नाही. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना शहादा येथील गुजरगल्ली भागात घडली. युवराज वसंत पाटील यांनी आपली नवी दुचाकी अंगणात उभी केली होती. चोरट्यांनी ती चोरून नेली. याबाबत शहादा पोलीस ठाण्यात युवराज पाटील यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
तिसरी घटना धडगावातील वडफळ्या भागात घडली. केशव तुडका पावरा यांनी त्यांची नवीन घेतलेली दुचाकी बांधकाम सुरू असलेल्या घराच्या बाजूला उभी केली होती. रात्रीतून चोरट्यांनी ती चोरून नेली. त्यांनीदेखील परिसरात शोध घेतला असता मिळून आली नाही. याबाबत पावरा यांनी धडगाव पोलिसात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.