पिसावर येथे तीन टन कचरा संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 12:49 IST2019-11-24T12:47:57+5:302019-11-24T12:49:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पिसावर, ता.कुकरमुंडा येथे ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमा अनावरणाचा सोहळा झाला. ...

Three tons of garbage collection at Pisawar | पिसावर येथे तीन टन कचरा संकलन

पिसावर येथे तीन टन कचरा संकलन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पिसावर, ता.कुकरमुंडा येथे ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमा अनावरणाचा सोहळा झाला. यानिमित्त श्री समर्थ बैठकीच्या सदस्यांनी गावात राबविलेल्या स्वच्छता अभियानात तीन टन कचरा संकलीत करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुकरमुंडाचे माजी सरपंच डॉ.विजय पटेल होते. प्रतिमा अनावरण पिसावरचे सरपंच अशोक लाश्या ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच बबन धुडकू पानपाटील, सदस्य राजेंद्र विक्रम पाटील, वि.का. सोसायटीचे सचिव बन्सी ओंकार पाटील, तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष दामोदर देवचंद ठाकरे, ग्रा.पं. सदस्य चंद्रसिंग भिल, भगवान भिल, छोटू भिल, संगणकतज्ञ सचिन पानपाटील, उत्तम भिल आदी उपस्थित होते. 
कार्यक्रमाआधी नंदुरबार, तळोदा व शहादा येथील श्री समर्थ बैठकीच्या 65 सदस्यांनी संपूर्ण गावभर स्वच्छता अभियान राबवून तीन टन कच:याचे संकलन केले. त्यानंतर संपूर्ण परिसरात रांगोळ्या, फुलांची सजावट, ग्रामपंचायत कार्यालय सजावट आदींनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. सोहळ्याची सुरुवात स्वागतगीताने झाली. श्री गणेश पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात उत्सव प्रभाकर पाटील यांनी डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवंदडा, ता.अलिबाग व श्री समर्थ बैठक याबाबतची माहिती विशद केली. सत्कार समारंभानंतर डॉ.अरुण नानासाहेब देसले, मंगला रवींद्र महाले, विजय भगवान चौधरी यांनी मनोगतातून प्रतिष्ठानच्यावतीने केल्या जाणा:या स्वच्छता अभियान, स्मशानभूमी, कब्रस्तान स्वच्छता, वृक्ष लागवड व संवर्धन, जलपुनर्भरण, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, साक्षरता आदींची माहिती दिली.  या सोहळ्यात संपूर्ण जिल्ह्यातील  श्री सदस्य, गावातील व  परिसरातील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण देसले यांनी तर आभार रवींद्र मोतीराम महाले यांनी मानले.

Web Title: Three tons of garbage collection at Pisawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.