ऊसतोड तांड्यावर आढळले २८ विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:22 PM2019-12-14T12:22:02+5:302019-12-14T12:22:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऊसतोड कामासाठी समशेरपूर ता.नंदुरबार भागात आलेल्या कन्नड, चाळीसगाव व मालेगाव येथील कामगारांसोबत त्यांचे पाल्य ...

Three students found on the slopes | ऊसतोड तांड्यावर आढळले २८ विद्यार्थी

ऊसतोड तांड्यावर आढळले २८ विद्यार्थी

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ऊसतोड कामासाठी समशेरपूर ता.नंदुरबार भागात आलेल्या कन्नड, चाळीसगाव व मालेगाव येथील कामगारांसोबत त्यांचे पाल्य तथा शालेय विद्यार्थी देखील आले आहेत. ही बाब शिक्षण विभागामार्फत करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात आढळून आले आहे.
समशेरपूर येथील अ‍ॅस्ट्रोरिया साखर कारखानाच्या ऊस कार्यक्षेत्रात बहुसंख्य शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली आहे. त्यात शिंदे, कोरीट, प्रकाशा यासह अन्य गावांचा देखील समावेश आहे. हा ऊसतोडणी कामासाठी चाळीसगाव, धुळे, कन्नड, साक्री व मालेगाव भागातील ऊसतोड मजूर समशेरपूर साखर कारखाना परिसरात दाखल झाले आहे. या कामगारांसोबत त्यांचे पाल्य परंतु शालेय शिक्षण घेणारी मुले देखील आली आहेत. समशेरपूर कारखान्याजवळील ऊसतोड मजूरांच्या तांड्यावर पौढ व्यक्तींसह काही सहा ते १४ वर्ष वयोगटातील मुलेही दिसून येत होते. त्यामुळे ही मुले शाळाबाह्य अथवा शालेय शिक्षण घेणारे असू शकतात, अशी शंका काही घटकांमधून उपस्थित करण्यात आली होती. त्यानुसार शिक्षण विभागामार्फत सर्व्हेक्षण करण्यात आले.
या सर्व्हेक्षणात एकुण २८ असून ही मुले असल्याचे आढळून आले असून ते सर्व शालेय स्तरावरील शिक्षण घेणारे असल्याचे देखील सिद्ध झाले आहे. शिक्षण विभागामार्फत या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून त्यांना समशेरपूर येथील शाळांमध्ये शिक्षणासाठी दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली परंतु तांड्यापासून समशेरपूरची लांब असल्यामुळे हे मुले शाळेत येणार नाही. ही बाब देखील शिक्षण विभागाने विचारात घेतली.
समशेरपूर शिवाय कोरीट ता.नंदुरबार येथेही उसतोड कामगार दाखल झाले असून त्यांच्या सोबतही काही शाळकरी विद्यार्थी आले असावे, असा अंदाज शिक्षण विभागामार्फत वर्तविण्यात आला. त्यानुसार तेथील तांड्यावरही सर्व्हेक्षण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सरशेरपूरच्या ऊसतोड वसाहतीप्रमाणे अन्य ऊसतोड कामगारांच्या वसाहतींवर देखील असे विद्यार्थी आढळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक ऊसतोड वसाहतींमध्ये जाऊन सर्व्हे करणे अपेक्षित असल्याचे काही जाणकार घटकांमधून सांगण्यात येत आहे.

Web Title: Three students found on the slopes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.