कांदे भरलेला ट्रक उलटल्याने तीन जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 12:31 IST2020-06-01T12:30:51+5:302020-06-01T12:31:00+5:30

नंदुरबार : साक्री रस्त्यावर नांदरखेडा फाट्यानजीक कांदे भरलेले वाहन उलटल्याने तीनजण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींमध्ये करण सुदाम भिल, ...

Three people were injured when a truck full of onions overturned | कांदे भरलेला ट्रक उलटल्याने तीन जण जखमी

कांदे भरलेला ट्रक उलटल्याने तीन जण जखमी

नंदुरबार : साक्री रस्त्यावर नांदरखेडा फाट्यानजीक कांदे भरलेले वाहन उलटल्याने तीनजण जखमी झाल्याची घटना घडली.
जखमींमध्ये करण सुदाम भिल, सुनील कैलास सोनवणे व जंगल्या सुरपा ठाकरे, रा.नांदरखेडा, ता.नंदुरबार अशी जखमींची नावे आहेत. आष्टे येथून कांदे भरून वाहन नंदुरबारकडे येत होते. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजुला उलटले. त्यात तिघे जखमी झाले. याबाबत करण सुदाम भिल यांनी फिर्याद दिल्याने चालक रवींद्र हिंमत माळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Three people were injured when a truck full of onions overturned