ट्रक व कारच्या अपघातात तीनजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:16 IST2019-11-29T12:16:19+5:302019-11-29T12:16:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव मालट्रक व कारची समोरासमोर धडक होऊन तीनजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी वळण ...

Three people were injured in a truck and car accident | ट्रक व कारच्या अपघातात तीनजण जखमी

ट्रक व कारच्या अपघातात तीनजण जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भरधाव मालट्रक व कारची समोरासमोर धडक होऊन तीनजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी वळण रस्त्यावरील ट्रक टर्मिनसजवळ घडली. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली   होती. 
किशोर राजधर पाटील, रा.धुळे व इतर दोनजण किरकोळ जखमी झाले. शहरातील वळण रस्त्याने कार (एम एच 21- 4455) धुळे चौफुलीकडून करण चौफुली कडे जात होती तर मालट्रक क्रमांक (एम एच 18 एए 7327) उड्डाण पुलाकडून धुळे चौफुली कडे जात होता. भरधाव वेगात असणा:या या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. कारमधीलतीन जण जखमी झाले आहे.  त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वर्दळीच्या रस्त्यावर अपघात घडल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस कर्मचारी दाखल होत वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त ट्रक रस्त्यातच असल्यामुळे काही काळासाठी वाहतूक ट्रक टर्मिनस व राजपूत लॉन्स मार्गे वळविण्यात  आली. दरम्यान, पूर्वी या ठिकाणी गतिरोधक होते. परंतु ते नंतर काढण्यात आल्याने अपघात होत आहेत. 
 

Web Title: Three people were injured in a truck and car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.