उड्डाणपुलावर अॅपे-दुचाकी अपघातात तिघे जखमी

By Admin | Updated: April 11, 2017 13:01 IST2017-04-11T13:01:23+5:302017-04-11T13:01:23+5:30

नंदुरबार शहरातील उड्डाणपुलावर अॅपे-रिक्षा आणि मोटारसायकल समोरासमोर धडून तीन जण जखमी झाल़े

Three people were injured in an accident in a two-wheeler accident | उड्डाणपुलावर अॅपे-दुचाकी अपघातात तिघे जखमी

उड्डाणपुलावर अॅपे-दुचाकी अपघातात तिघे जखमी

 नंदुरबार, दि.11 - शहरातील उड्डाणपुलावर अॅपे-रिक्षा आणि मोटारसायकल समोरासमोर धडून तीन जण जखमी झाल़े 

शहरातील उड्डाणपुलावरून सोमवारी रात्री देवेंद्र उत्तम अहिरे, गणेश प्रितम आखाडे व सुरूपसिंग कागल्या तडवी सर्व रा़ पहेलवान नगर वाघोदा शिवार नंदुरबार हे दुचाकीने जात असताना समोरून येणा:या मालवाहू अॅपे रिक्षाने त्यांना जोरदार धडकेत दोघी वाहनांचे बेसुमार नुकसान झाल़े धडकेत गंभीर जखमी झालेल्या तिघांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आल़े या घटनेमुळे रात्री उशिरार्पयत उड्डाणपुलावरची वाहतूक विस्कळीत झाली होती़ याबाबत सोमवारी रात्री उशिरा नंदुरबर उपनगर पोलीस ठाण्यात देवेंद्र उत्तम अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अॅपे रिक्षा चालक (नाव गाव माहित नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े  

Web Title: Three people were injured in an accident in a two-wheeler accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.