विसरवाडी येथे पेट्रोलपंपाचे तीन नोझल सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 13:02 IST2018-04-27T13:02:26+5:302018-04-27T13:02:26+5:30
पाणी मिश्रीत इंधन : तपासणी पथकाचे पाचारण

विसरवाडी येथे पेट्रोलपंपाचे तीन नोझल सील
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 27 : तालुक्यातील विसरवाडी गावालगत असलेले एच.पी.सी़एल कंपनीचे हार्दीक पेट्रोलपंप येथे पाणी मिश्रित डिङोल विक्रीच्या संशयावरून पंपावरील तीन नोझल महसूल प्रशासनाने सील केले आहे.
विसरवाडी येथील या पंपावर सूरत येथील कुलदिप वसंत गावीत हे आपल्या चारचाकी वाहनात (क्रमांक डीजे 26 टी 5375) 15 लीटर डिङोल भरणा करीत असतांना त्यांना डिङोलमध्ये शंका आली़ त्या वेळी त्यांनी डिङोलची तपासणी केली असता त्यात, पाणी मिश्रीत डिङोल दिसून आल्याने त्यांनी विसरवाडी पोलीस ठाण्याला संपर्क करुन पेट्रोल पंपावरील इंधनाची पाहणी करावी अशी तक्रार केली.
दरम्यान याच काळात औरंगाबाद येथील गणेश भंगाळे यांनी टेम्पोमध्ये 15 लीटर डिङोल भरणा केला असता पेट्रोलपंपाजवळ पाचशे ते सहाशे मीटर अंतर पुढे गेल्यानंतर त्यांचे वाहन अचानक बंद पडले. त्यांनी टेम्पोला पंपावर आणल्यानंतर डिङोल बाबत तक्रार केली.
तहसीलदार प्रमोद वसावे व विसरवाडीचे पोलीस निरीक्षक धंनजय पाटील यांनी एच.पी.सी़एल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी परमार यांचेशी संपर्क करुन घडलेला प्रकार कळविला असता कंपनीचे तपासणी पथक पोहचेल तोवर तुमच्या अधिकार क्षेत्रातील नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे नायब तहसीलदार राजेंद्र नजन, पुरवठा निरीक्षक मिलिंद निकम, आर.बी.वळवी, आर.एम गवळी यांनी घटनेचा पंचनामा करीत पेट्रोल पंपावरील असलेले डिङोलचे तीन नोझल सील केले. यावेळी ग्राहक व नागरीकांची मोठय़ा संख्येने गर्दी केली होती़