पोस्को कायद्याअंतर्गत आणखी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST2021-06-17T04:21:38+5:302021-06-17T04:21:38+5:30
शहादा : ब्राह्मणपुरी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी आणखी तीन संशयितांना अटक करण्यात आली असून अटकेतील ...

पोस्को कायद्याअंतर्गत आणखी तिघांना अटक
शहादा : ब्राह्मणपुरी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी आणखी तीन संशयितांना अटक करण्यात आली असून अटकेतील संशयितांची संख्या सहा झाली आहे. गर्भपात करणाऱ्या डॅाक्टरचा शोध सुरू आहे.
ब्राम्हणपुरी शिवारात शेतात कामाला आलेल्या मध्य प्रदेशातील कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर पंकज मंगा पाटील याने पाच महिन्यांपूर्वी अत्याचार केला होता. त्यातून मुुलगी गर्भवती राहिली होती. मलफा येथे तिचा गर्भपातही करण्यात आला होता. याबाबत १४ जून रोजी शहादा पोलिसात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी पंकज मंगा पाटील, शांताराम भीमा पाटील, प्रेमराज उर्फ भुऱ्या शांताराम पाटील यांना अटक करण्यात आली आहे. तर बुधवार, १६ रोजी अंबालाल सुभाष पाटील, नर्स मुमताज ऊर्फ मुन्नी हसन पठाण, तसेच सीटीस्कॅन सेंटर चालक संजय मंगेश पाटील या तिघांना अटक करण्यात आली आहे. गर्भपात करणाऱ्या डॅाक्टरचा शोध सुरू आहे.