नवापुर तालुक्यातून तीन लाखांचे लाकूड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 12:15 IST2019-06-21T12:15:30+5:302019-06-21T12:15:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील जामतलाव चौफुलीवर लाकूडाची अवैध तस्करी करणा:या वाहनाला अडवून कारवाई करत तीन लाख रुपयांचा ...

नवापुर तालुक्यातून तीन लाखांचे लाकूड जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील जामतलाव चौफुलीवर लाकूडाची अवैध तस्करी करणा:या वाहनाला अडवून कारवाई करत तीन लाख रुपयांचा मुद्देमाल वनविभागाच्या पथकाने जप्त केला़ गुरुवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली़
जामतलाव शिवारातून लाकडीची अवैधपणे वाहतूक होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती़ माहितीवरुन त्यांनी गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास जामतलाव फाटय़ाजवळ सापळा रचला होता़ दरम्यान पायविहीर रस्त्याने संशयीत वाहन येत असल्याचे पथकाला दिसून आल़े पथकाने वाहनाला अडवले असता, संशयित चालकाने वाहन लॉक करुन पळ काढला़ वाहनाची तपासणी केली असता त्यात ताज्या तोडीचे अवैध साग चौपाट व खैर नग भरलेले आढळून आले. वाहन जप्त करुन पथकाने टोचन करुन नवापुर येथील शासकीय विक्री आगार आणून जमा केल़े ही कारवाई नंदुरबार वनविभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या मार्गदर्शनात आर.बी.पवार, वनपाल प्रकाश मावची, डी.के.जाधव, वनरक्षक बडगुजर, कमलेश वसावे, जामतलाव वनरक्षक पवार यांनी केली़ पथकाने साग चौपाट व खैर नग तसेच विना क्रमांकाचे पांढ:या रंगाचे वाहन असा 3 लाख 31 हजार मुद्देमाल जप्त केला़ याप्रकरणी वडकळंबी वनपाल यांनी वनगुन्हा दाखल केला आह़े वनाधिका:यांकडून घटनेचा तपास सुरु आह़े
नवापुर तालुक्यात सातत्याने सुरु असलेल्या कारवायांमुळे लाकूड तस्करांचे कंबरडे मोडले असून अवैध लाकूड वाहतूकीवर अंकुश बसला असल्याचे चित्र आह़े