१४४ दिवसांत झाले तीन लाख जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST2021-06-10T04:21:09+5:302021-06-10T04:21:09+5:30

नवापूर तालुक्यात १८ ते ४४ वयोगटातील दोन हजार ६४४ व्यक्तींनी पहिला डोस, तर ८४ व्यक्तींनी दुसरा डोस ...

Three lakh people were vaccinated in 144 days | १४४ दिवसांत झाले तीन लाख जणांचे लसीकरण

१४४ दिवसांत झाले तीन लाख जणांचे लसीकरण

नवापूर तालुक्यात १८ ते ४४ वयोगटातील दोन हजार ६४४ व्यक्तींनी पहिला डोस, तर ८४ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे, तर ४५ वर्षांवरील ३६ हजार २८३ व्यक्तींनी पहिला, तर चार हजार २१५ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. दोन हजार ३४७ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला, त्यापैकी एक हजार ३१८ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. आठ हजार ८६५ कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनी पहिला, तर एक हजार ५७२ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे, असे एकूण ५७ हजार ३२७ व्यक्तींनी आतापर्यंत लसीकरण करून घेतले आहे.

शहादा तालुक्यात वयोगटातील १८ ते ४४ वयोगटातील दोन हजार ५०९ व्यक्तींनी पहिला, तर २५१ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे, तर ४५ वर्षांवरील ५४ हजार ९३५ व्यक्तींनी पहिला तर ११ हजार ५१३ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. तीन हजार ४०० आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला, त्यापैकी एक हजार ९९४ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. सहा हजार ८९० कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनी पहिला तर दोन हजार ३१२ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण ८२ हजार ८०४ व्यक्तींनी आतापर्यंत लसीकरण करून घेतले आहे.

तळोदा तालुक्यात १८ ते ४४ वयोगटातील दोन हजार २४ व्यक्तींनी पहिला डोस तर ६१ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे, तर ४५ वर्षांवरील १९ हजार १७२ व्यक्तींनी पहिला तर चार हजार २०९ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. एक हजार ७७३ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला त्यापैकी ६४४ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. दोन हजार ६८६ कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनी पहिला तर एक हजार ४४ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण ३१ हजार ६१३ व्यक्तींनी आतापर्यंत लसीकरण करून घेतले आहे.

अक्कलकुवा तालुक्यात १८ ते ४४ वयोगटातील ७७६ व्यक्तींनी पहिला डोस, तर २८० व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे, तर ४५ वर्षांवरील १४ हजार ५९ व्यक्तींनी पहिला, तर एक हजार दोन व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. एक हजार ८९३ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला, त्यापैकी एक हजार १७ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. पाच हजार २२२ कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनी पहिला, तर एक हजार ४५ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे, असे एकूण २५ हजार २९४ व्यक्तींनी आतापर्यंत लसीकरण करून घेतले आहे.

धडगाव तालुक्यात १८ ते ४४ वयोगटातील ५४० व्यक्तींनी पहिला डोस, तर ३० व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षांवरील ७ हजार ४८९ व्यक्तींनी पहिला, तर ४२७ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. दोन हजार २०८ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला, त्यापैकी ८०५ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. दोन हजार ८७८ कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनी पहिला, तर ४३३ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे, असे एकूण १४ हजार ८१० व्यक्तींनी आतापर्यंत लसीकरण करून घेतले आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ रोजी पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय येथे लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्याने २२ एप्रिल रोजी लसीकरणाचा एक लाखाचा, तर १२ मे रोजी दोन लाखांचा टप्पा पूर्ण केला. पालकमंत्री पाडवी यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: लस घेऊन नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन केले आहे.

ग्रामीण भागात असलेले गैरसमज दूर करून लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रशासनाने जनजागृतीवर विशेष भर दिला आहे. नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी लोककला, स्थानिक भाषा, बैठका, घरोघरी भेटी आदी विविध माध्यमांचा उपयोग करण्यात येत आहे. ग्रामस्तरावरील आरोग्य कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका आदींचा सहभागही महत्त्वाचा ठरला आहे.

कोरोनापासून संरक्षणासाठी नागरिकांनी कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे आणि लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील एकूण लसीकरण

*आरोग्य कर्मचारी (पाहिला डोस) -१५ हजार ६७

(दुसरा डोस) -८ हजार १८०

* कोरोना योद्धा कर्मचारी (पहिला डोस )- ३५ हजार ४७४

(दुसरा डोस )- ८ हजार ९७४

* १८ ते ४४ वयोगटातील (पहिला डोस )- १४ हजार २८९

(दुसरा डोस )- १ हजार ४८५

* ४५ वर्षांवरील वयोगटातील (पहिला डोस)- १ लाख ८६ हजार ४३६

( दुसरा डोस)- ३२ हजार ३०७

* नंदुरबार जिल्ह्यात एकूण लसीकरण - ३ लाख २ हजार २१२

Web Title: Three lakh people were vaccinated in 144 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.