मिठ्याफळीजवळ दुचाकी अपघातात तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:32 IST2019-12-31T12:32:37+5:302019-12-31T12:32:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बºहाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावर मिठ्याफळीजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नी व मुलगी जखमी झाल्याची घटना २४ ...

मिठ्याफळीजवळ दुचाकी अपघातात तिघे जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बºहाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावर मिठ्याफळीजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नी व मुलगी जखमी झाल्याची घटना २४ डिसेंबर रोजी घडली होती़ तिघांवर उपचार पूर्ण झाल्यानंतर रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
वेरी ता़ अक्कलकुवा येथील देवजी रेवला वसावे हे पत्नी हुनारीबाई व मुलगी सुमित्राबाई वसावे यांच्यासोबत दुचाकीने अक्कलकुवा येथे जात असताना मागून येणाऱ्या एमएच ४० बीएल २८७२ या ट्रकने दुचाकीला धडक दिली यात देवजी वसावे, हुनारीबाई व सुमित्राबाई हे जखमी झाले़ याबाबत देवजी वसावे यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन शेख हबीब शेख गुलाब नबीब रा़ नागपूर याच्याविरोधात गुन्हा दाखल केले़