ट्रॅव्हल्सला झालेल्या अपघातात तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 12:41 IST2019-10-02T12:41:14+5:302019-10-02T12:41:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सुरत येथून शहादा मार्गाने शिरपूरकडे जाणा:या खाजगी आराम बसला शहादा शहराजवळ अपघात झाला़ सोमवारी ...

ट्रॅव्हल्सला झालेल्या अपघातात तिघे जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सुरत येथून शहादा मार्गाने शिरपूरकडे जाणा:या खाजगी आराम बसला शहादा शहराजवळ अपघात झाला़ सोमवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघात तिघे जखमी झाल़े
सुरत येथील श्री हरी ट्रॅव्हल्सची बस शहादा मार्गाने शिरपूकडे जात असताना सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास शहादा शहराजवळ कॉटन मिल समोरील लिंबाच्या झाडाला ठोकली गेली़ चालक पंडीत भागवत पाटील याने भरधाव वेगात चालवल्याने हा प्रकार घडला होता़ अपघातात मनोज रणछोड चौधरी रा़ वडाळी ता़शहादा, विष्णू रुपा पाटील व विजय रघुनाथ सूर्यवंशी हे तिघे जखमी झाले होत़े
याबाबत मनोज चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बसचालक पंडीत पाटील याच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पाडवी करत आहेत़