जमावाच्या मारहाणीत तीन जखमी
By Admin | Updated: April 17, 2017 17:15 IST2017-04-17T17:15:50+5:302017-04-17T17:15:50+5:30
शहरातील बंधारहट्टी भागात घडली. जमावाने तलवार, फायटरने मारहाण केल्याने भीती पसरली होती.

जमावाच्या मारहाणीत तीन जखमी
नंदुरबार, दि. 17 - जुन्या वादातून जमावाने मारहाण केल्याने तीनजण जखमी झाल्याची घटना शहरातील बंधारहट्टी भागात घडली. जमावाने तलवार, फायटरने मारहाण केल्याने भीती पसरली होती.
बंधारहट्टी भागात राहणा:या सबूबाई जितेंद्र वसावे व अशोक विक्रम ठाकरे या दोन कुटूंबात वाद होता. त्या वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. सबूबाई वसावे यांच्या घरासमोर जमाव जमला. जमावाने हातात फायटर, तलवारी, पाईप व लाकडी दांडका घेत वसावे कुटूंबावर चाल केली.
बेदम मारहाणीत सबूबाई वसावे यांच्यासह अमित जितेंद्र वसावे व लक्ष्मीबाई अरुण वसावे हे जखमी झाले. या प्रकरणी शहर पोलिसात अशोक विक्रम ठाकरे, कमाबाई विक्रम ठाकरे, अरुण भु:या भिल, अनिल ठाकरे, विजय कथ्या पावरा, विक्की सुरेश पाडवी, दिल्या रामू जाधव, कैलास अशोक भिल, अशोक झो:या ठाकरे, क्रिष्णा अशोक भिल सर्व रा.बंधारहट्टी यांच्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.