शहाद्यात पाणी भरण्यावरून झालेल्या हाणामारीत नगरसेवकासह तिघे जखमी
By Admin | Updated: June 14, 2017 16:58 IST2017-06-14T16:58:41+5:302017-06-14T16:58:41+5:30
मारहाणीत पालिकेचे विद्यमान बांधकाम समिती सभापती सद्दाम तेली यांच्यासह तीनजण गंभीर जखमी झाले.

शहाद्यात पाणी भरण्यावरून झालेल्या हाणामारीत नगरसेवकासह तिघे जखमी
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि. 14 - शहादा येथील गरीब नवाज कॉलनीत सार्वजनिक नळावर पाणी भरण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत पालिकेचे विद्यमान बांधकाम समिती सभापती सद्दाम तेली यांच्यासह तीनजण गंभीर जखमी झाले. परिसरात तणाव निर्माण झाला असून वाढीव बंदोबस्त लावण्यात आला आहे.
शहादा येथील गरीब नवाज कॉलनीतील गोसीया नगर परिसरात बुधवारी दुपारी सार्वजनिक नळांना पाणी आले. त्यावेळी माजी नगरसेवक शेख मुख्तार शेख अहमद व विद्यमान बांधकाम समिती सभापती सद्दाम तेली यांच्या कुटुंबात वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणी झाले. सद्दाम तेली यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. इतर दोन जणदेखील गंभीर जखमी झाले आहेत.