तोरखेडा येथे तीन घरे आगीत खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 12:01 IST2019-06-17T12:00:48+5:302019-06-17T12:01:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तोरखेडा : शहादा तालुक्यातील तोरखेडा येथे चिमणीचा भडका उडाल्याने लागलेल्या आगीत तीन घरे जळून खाक झाली़ ...

तोरखेडा येथे तीन घरे आगीत खाक
लोकमत न्यूज नेटवर्क
तोरखेडा : शहादा तालुक्यातील तोरखेडा येथे चिमणीचा भडका उडाल्याने लागलेल्या आगीत तीन घरे जळून खाक झाली़ शनिवारी मध्यरात्री लागलेली आग रविवारी पहाटेर्पयत सुरु होती़ आगीत सर्व साहित्य जळाल्याने तीन कुटूंबे रस्त्यावर आली आहेत़
तोरखेडा येथील दगा सुकन मोरे यांच्या घराला आग लागल्याचे मध्यरात्री ग्रामस्थांना दिसून आल़े ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला असता, वेगवान वा:यांमुळे आग फोफावून शेजारील झगा सुकन मोरे व हिरालाल सुकन मोरे यांच्या घरार्पयत जाऊन पोहोचली़ अध्र्या तासात आगीने तिघी घरांना विळख्यात घेतल्याने एकच आरडाओरड सुरु झाली़ चिंचोळ्या गल्लीत एकाला एक लागून असलेल्या इतर घरांर्पयत आग पोहोचून नुकसान होण्याचा धोका असल्याने ग्रामस्थांनी शिरपूर आणि शहादा येथे अगिAशामन बंबांना माहिती दिली होती़ रात्री 2 वाजेच्या सुमारास बंब आल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आल़े परंतू तोवर तिन्ही घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य, रोख रक्कम जळून खाक झाली़ सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्यासह कर्मचा:यांनी भेटी देत पंचनामा केला़ आगीत 12 ते 15 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आह़े पंचायत समिती सदस्य प्रियदर्शन कदमबांडे, जयसिंग गरुड, रहिम पिंजारी, चंद्रकांत जाधव, असाराम धनगर यांच्यासह ग्रामस्थांनी येथे भेट पिडितांची मदत केली़